Water Shortage  Agrowon
ताज्या बातम्या

Water Shortage : जळगाव जिल्ह्यांत टंचाई वाढू लागली

जिल्ह्यात पाणीटंचाईच्या झळा सुरू झाल्या आहेत. अतितापमानाने धरणातील पाणीसाठा दिवसेंदिवस कमी होत आहे.

Team Agrowon

Jalgaon News : जिल्ह्यात पाणीटंचाईच्या झळा सुरू झाल्या आहेत. अतितापमानाने धरणातील पाणीसाठा दिवसेंदिवस कमी होत आहे. दुसरीकडे भूगर्भातील पाणीपातळी खालावत आहे. सध्या जिल्ह्यात नऊ गांवाना दहा टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे.

जिल्ह्यात टंचाईग्रस्त भागासाठी जिल्हा प्रशासनाने यापूर्वीच दोन कोटी ४४ लाख ६९ हजारांचा टंचाई आराखडा तयार केला आहे. त्यानुसार पाणीटंचाईवर उपाययोजना सुरू आहेत.

टंचाईग्रस्त गावे व टँकरची संख्या अशी

मोरगाव, रोटवद, नेरी दिगर (ता. जामनेर) - तीन

तळबंदतांडा, वसंतवाडी (ता. भडगाव) - दोन

एनगाव (ता. बोदवड) - एक

हनुमंतखेडा, खेडीढोक - दोन

मौजे पिंपळगाव (ता. चाळीसगाव) - दोन

मौजे हातगाव भिल्ल वस्ती (ता. चाळीसगाव)

मौजे लोणवाडी बुद्रुक (ता. जळगाव) अशा दोन ठिकाणी तात्पुरत्या पाणीपुरवठा योजना तयार करण्यात आल्या आहेत.

पावसाळ्यात समस्या आणखी वाढणार

साधारणतः पाणीटंचाई आराखडा मार्च ते जूनपर्यंत तयार केला जातो. कारण जूनमध्ये पाऊस पडून पाणीटंचाई कमी होते, असे गृहीतक आहे. मात्र यंदा ‘अल निनो’च्या प्रभावामुळे तापमानात वाढ होईल, सोबतच पावसाळाही लांबेल अशी चिन्हे आहेत.

त्यामुळे जिल्हा प्रशासनाने खास बाब म्हणून एक कोटी ९७ लाख ९३ हजारांचा विशेष टंचाई आराखडा तयार करून ठेवला आहे. जूननंतर जर पाऊस झाला नाही तर या आराखड्यातील तरतुदीतून पाणीपुरवठ्याची व्यवस्था केली जाणार आहे.

धरणाचे नाव यंदाचा पाणीसाठा टक्के २०२२ मधील जलसाठा

हतनूर ५३.०४ ५२.९४

गिरणा २९.२४ ४५.७८

वाघूर ७१.०४ ८०.२७

मन्याड १७.९८ २२.९२

बोरी ५.०१ १७.७८

भोकरबारी ३.२९ ३१.७१

सुकी ६७.९५ ६४.९५

अभोरा ६७.३२ ६५.६६

अग्नावती १६.५७ २६.१६

तोंडापूर ४७.५९ ४७.५९

हिवरा २१.९२ १७.९९

मंगरूळ ५२.४१ ४८.४६

बहुळा ३०.३४ ४३.६८

मोर ६९.६० ७०.१५

अंजनी ३३.३४ ४८.८०

गूळ ६९.९० ५९.२२

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Sugar Price: साखरेचा किरकोळ दर सलग चौथ्या दिवशी ६० रुपयांच्या खाली, सणासुदीतील मागणीमुळे दरवाढीचा कल

Drought 2026 : राज्य सरकार किती तालुक्यात दुष्काळ जाहीर करू शकतं?

Wildlife Damage: वन्यप्राण्यांपासून पिकांचे नुकसान थांबवा : पालकमंत्री अ‍ॅड. यशोमती ठाकूर

Rain Dry Spell: पावसाची दडी, खरीप संकटात; भरघोस मदतीची मागणी

Maharashtra Drought: महाराष्ट्रात दुष्काळ; शेतकऱ्यांना सरसकट हेक्टरी ५० हजारांची मदत द्या- हर्षवर्धन सपकाळ

SCROLL FOR NEXT