Water Shortage : हिंगणघाटकाठी नदी, मात्र नागरिकांचा घसा कोरडाच

शहराची लोकसंख्या सव्वा लाखांच्या घरात आहे. नागरिकांची तहान भागविण्यासाठी शहराकाठी निसर्ग प्रदत्त वणा नदी आहे.
Water Shortage
Water Shortage Agrowon
Published on
Updated on

Wardha News शहराची लोकसंख्या सव्वा लाखांच्या घरात आहे. नागरिकांची तहान भागविण्यासाठी शहराकाठी निसर्ग प्रदत्त वणा नदी (River) आहे. पाण्याची साठवणूक करणारा बंधारा मोडकळीस आल्याने नव्या बंधाऱ्याचा (Bunds) प्रस्ताव मंत्रालयात पाठविला. मात्र गत पाच वर्षांपासून प्रस्ताव धुळखात आहे. त्यामुळे शहराकाठी नदी मात्र घसा कोरडाच अशी स्थिती नागरिकांची झाली आहे.

शहराची तहान भागविण्यासाठी वणा नदीवर बंधारा बांधला होता. मात्र त्याचे काम निकृष्ट दर्जाचे झाले. त्यामुळे हा बंधारा पाणीसाठा करण्यसाठी निरुपयोगी झाला आहे. पाण्याची साठवणूक होत नसल्याने शहरात तब्बल १५ जलकुंभाची निर्मिती करण्यात आली. असे असतानाही शहराची तहान दररोज भागविणे शक्य होत नाही.

Water Shortage
Maharashtra Water Shortage : राज्यात पाणीपुरवठ्यासाठी धावताहेत १०१ टॅंकर, पाणीटंचाईच्या झळा

एक दिवसाआड पाणीपुरवठा केला जात आहे. शहराला २४ तास पाणीपुरवठा करावा, यासाठी आमदार समीर कुणावार यांनी वणा नदीवर नव्याने बंधारा बांधण्याचा प्रस्ताव ठेवला. या संदर्भात सप्टेंबर २०१७ ला शासनस्तरावर बैठक झाली. त्यानंतर सातत्याने पाठपुरावा करण्यात आला. मात्र पाण्याचा प्रश्न अजूनही सुटलेला नाही.

Water Shortage
Amravati Water Shortage : खरीप समाधानकारक, रब्बीत पाणीटंचाई

५९ कोटींचा प्रस्ताव

बंधाऱ्याला परवानगी देऊन मंजुरी मिळावी, यासाठी नगर रचनाकार मंत्री, सचिव, संबंधित सर्व विभागांसोबत चर्चा करून काम पूर्णत्वास नेण्यासाठी आराखडा मंत्रालयात सादर करण्यात येणार आहे. साधारण बंधाऱ्यासाठी ५९ कोटी रुपयांचा हा प्रस्ताव आहे. यापैकी २५ टक्के रक्कम नगरपालिकेला भरण्याची अट घालण्यात आली आहे.

आमदार निधीतून रक्कम वळती करा

नगरपालिकेवरील बसणारा भुर्दंड आपल्या वार्षिक आमदार विकास निधीतून वळता करावा, अशी भूमिका घेत बंधारा तातडीने पूर्ण व्हावा, अशी मागणी आमदार समीर कुणावार यांनी केली आहे. विधानसभेत लक्षवेधी सूचना मांडली. त्याद्वारे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांच्या माध्यमातून मागणी पूर्ण करण्याचा प्रयत्न सुरू आहे, असे कुणावार म्हणाले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com