Water Crisis  Agrowon
ताज्या बातम्या

Water Crisis : पश्चिम महाराष्ट्रात पाणीटंचाईत वाढ

Water Shortage : ऑगस्ट महिना संपून सप्टेंबर महिना सुरू झाला तरी अजूनही पुणे महसूल विभागातील अनेक भागांमध्ये समाधानकारक पाऊस झालेला नाही.

Team Agrowon

Pune News : ऑगस्ट महिना संपून सप्टेंबर महिना सुरू झाला तरी अजूनही अनेक भागांमध्ये समाधानकारक पाऊस झालेला नाही. पुणे विभागातील पुणे, सातारा, सांगली, आणि सोलापूर या जिल्ह्यात पाणीटंचाईची समस्या दिवसेंदिवस यात असल्याचे दिसून येत आहे.

त्यामुळे पुणे विभागात अजूनही १६७ टँकरने पाणीपुरवठा केला जात आहे. येत्या काळात पाऊस न झाल्यास पाणी टंचाईच्या झळा आणखी तीव्र होतील, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.

मे महिन्यात पुणे विभागात ५१ टँकरने ६२ गावांमधील १५ हजार ७८३ नागरिकांना टँकरने पाणीपुरवठा करण्यात येत होता. आता यामध्ये वाढ होऊन १६७ टॅंकरद्वारे १५२ गावे व ९४० वाड्या-वस्त्यांमधील ३ लाख ४ हजार नागरिकांना टॅंकरने पाणीपुरवठा करण्यात येत आहे.

असाच पाऊस लांबल्यास टॅंकरच्या संख्येमध्ये अजून वाढ होण्याची शक्यता प्रशासनाकडून व्यक्त केली जात आहे. गेल्या वर्षी विभागात अवघा एक टॅंकर सुरू होती. त्या तुलनेत चालू वर्षी पाण्याची भीषण संकट उभे राहण्याची शक्यता आहे.

मे महिन्यात टॅंकरची संख्या सर्वाधिक असते. मात्र, ऐन पावसाळ्यात अनेक गावांना टँकरद्वारे पाणीपुरवठा करावा लागत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचे पावसाकडे लक्ष लागले आहे.

पुणे जिल्ह्यातील आंबेगाव, जुन्नर, खेड, पुरंदर आदी तालुक्यांतील ३६ गावांमधील २७१ वाड्या-वस्त्यांना ४० टँकरने पाणीपुरवठा करण्यात येत आहे. जिल्ह्यातील खासगी २३ विहिरी अधिग्रहीत केल्या आहेत. यामध्ये आंबेगाव तालुक्यातील ७ गावांमधील ४४ वाड्या-वस्त्यांवरील २२ हजार ५७ नागरिकांना टँकरने, जुन्नरमधील ११ गावांमधील १६ हजार ११८ नागरिकांना टँकरद्वारे पाणीपुरवठा होत आहे.

पुणे विभागातील टॅंकरची स्थिती :

जिल्हा---गावे---वाड्यावस्त्या---टॅंकर संख्या

पुणे---३४---२७४---४०

सातारा---७८---४००---८३

सांगली---२९---१७६---३४

सोलापूर---११---९०---१०

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Farm Loan Waiver: कर्जमाफी योजनेची प्रत्यक्ष अंमलबजावणी सुरु, शेतकऱ्यांची पहिली यादी जाहीर

Pandharpur Vitthal Darshan: दर्शन रांगेतील वयोवृद्ध दांपत्याला थेट विठ्ठल दर्शन

Kharif Crop Insurance: शेतकऱ्यांची खरीप पीकविम्याकडे पाठ

Fake Soybean Seed Issue: बोगस बियाण्यांच्या तक्रारीवर उलट शेतकऱ्यांवरच प्रश्नांचा भडिमार

Agriculture Scheme Subsidy Issue: परभणी जिल्ह्यातील ६७० शेतकरी अद्यापही अनुदानाच्या प्रतीक्षेत

SCROLL FOR NEXT