Pune Water Scarcity  Agrowon
ताज्या बातम्या

Pune Water Scarcity : पुणे जिल्ह्यात पाणी टंचाईस सुरुवात

आंबेगाव तालुक्यातील आठ गावांना सहा टॅंकरने पाणी पुरवठा

Team Agrowon

अॅग्रोवन वृत्तसेवा
पुणे : गेल्या वर्षी झालेल्या दमदार पावसामुळे जिल्ह्यातील सर्वच धरणे (Dam) पूर्ण क्षमतेने भरली होती. त्यामुळे यंदा जिल्ह्यात टँकर (Tanker) सुरू करण्यासाठी एप्रिलचा दुसरा आठवडा उजाडला.

आंबेगाव तालुक्यातील आठ गावांसाठी सहा टँकर सुरू करण्यास जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी मंजुरी दिली आहे.

आंबेगाव तालुक्यातील या आठ गावांना शासकीय आणि खासगी टँकरने पाणीपुरवठा करण्यात येत आहे. यामुळे ग्रामीण भागात पाणीटंचाई भासू लागल्याचे दिसून येत आहे.

जिल्ह्यात २५ धरणे असून या सर्व धरणांच्या पाणलोट क्षेत्रात गेल्या वर्षी समाधानकारक पाऊस झाला होता. त्यामुळे सर्वच धरणे १०० टक्के भरली होती.

तसेच परतीचा पाऊस सुद्धा चांगला झाला. गेल्या वर्षी जानेवारीअखेरीस टँकर सुरू करावे लागते होते. परंतु चालू वर्षी भूजल पातळीत चांगली वाढ झाल्याने पाण्याची बऱ्यापैकी उपलब्धता होती. त्यामुळे जिल्हा प्रशासनाकडे गेल्या आठपड्यापर्यंत टँकरने मागणी केलेली नव्हती.


यंदा एप्रिल महिन्याचा दुसरा आठवडा सुरू झाला आहे. आतापर्यंत जिल्ह्यात कुठेही पाणी टँकरने पाणीपुरवठा सुरू झालेला नव्हता.

परंतु वाढत्या झळामुळे पाण्याची मागणी हळूहळू वाढू लागली आहे. जिल्ह्यातील इतर तालुक्यात पाण्याची स्थिती बऱ्यापैकी असली तरी येत्या काळात टँकरची मागणी वाढण्याची शक्यता आहे.

आंबेगाव तालुक्यातील कारेगाव, पारगाव तर्फे खेड, भावडी, थुगाव- निघोटवाडी, कुरवंडी या गावांत प्रत्येकी एक, तर मांदळेवाडी, लळेघर आणि जांभोरी या गावांना मिळून एक असे एकूण सहा टँकर सुरू करण्यास मान्यता देण्यात आली आहे, अशी माहिती जिल्हा प्रशासनाकडून देण्यात आली.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Sankeshwari Chilli: संकेश्वरी मिरचीचा हंगाम अतिवृष्टीमुळे कोमेजला

Sugarcane Price Protest: ऊसदरासाठी ‘संघर्ष समिती’च्या ठिय्या आंदोलनास सुरुवात

Flower Farmer Issue: बाजारभावातील घसरणीमुळे झेंडू उत्पादक अडचणीत

Florida Citrus Varieties: फ्लोरिडातील संकरित लिंबूवर्गीय जाती महाराष्ट्रासाठी फायदेशीर

Vidarbha Irrigation Project: हुमन प्रकल्प रखडल्याने ४६ हजार हेक्टर क्षेत्र कोरडे

SCROLL FOR NEXT