Water management Agrowon
ताज्या बातम्या

‘सर्वांगीण विकासासाठी पाण्याचे नियोजन महत्त्वाचे’

प्रत्येक गावाने पाणलोट विकास कार्यक्रम हाती घेणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन सगरोळी कृषी विज्ञान केंद्राच्या प्रमुख शास्त्रज्ञ डॉ. माधुरी रेवणवार यांनी केले.

Team Agrowon

ॲग्रोवन वृत्तसेवा

नांदेड : गावासोबतच शेतकऱ्यांचा सर्वांगीण विकास करायचा असेल तर पाण्याचे नियोजन अत्यंत महत्त्वाचे आहे. यासाठी प्रत्येक गावाने पाणलोट विकास कार्यक्रम (Watershed Development Programme) हाती घेणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन सगरोळी कृषी विज्ञान केंद्राच्या प्रमुख शास्त्रज्ञ डॉ. माधुरी रेवणवार यांनी केले. Watershed Development Programme

पाण्याचा शेतीमध्ये वापर, रब्बी पीक नियोजन आणि एकात्मिक कीड व रोग नियंत्रण या विषयांवर संस्कृती संवर्धन मंडळ संचलित कृषी विज्ञान केंद्र आणि एकात्मिक पाणलोट विकास व हवामान बदल अनुकूल कार्यक्रमाच्या संयुक्त विद्यमाने सोमवारी (ता. १४) काटकळंबा (ता. कंधार) येथे शेतकरी मेळावा आयोजित केला. या वेळी त्या बोलत होत्या. या वेळी पाण्याचा ताळेबंद या विषयावर वसंत रावणगावकर, रबी पीक मार्गदर्शन प्रा. कापिल इंगळे व कीड व रोग नियंत्रण डॉ. कृष्णा आंभुरे यांनी मार्गदर्शन केले. जय शिवराय पाणलोट समितीचे अध्यक्ष बाबूराव बस्वदे यांनी काटकळंबा गाव टंचाईग्रस्त ते पाणीदार गाव यातील अनेक उपक्रमाचा आढावा घेतला. पाणलोट समितीचे सचिव मोहन पवार यांनी आजपर्यंत झालेल्या कामाची माहिती दिली.

या वेळी संस्थेचे प्रकल्प व्यवस्थापक गंगाधर कानगुलवार, विजय भिसे, गंगामणी श्रीगिरे, संगमेश्वर शिवशेट्टे, अविनाश जोगी, प्रदीप भिसे व इर्शाद सय्यद, निवृत्ती जोगपेटे व मोहन पवार यांनी परिश्रम घेतले. चौकट ः सोशल इम्पॅक्ट अॅवॉर्डने सन्मान सगरोळी येथील संस्कृति संवर्धन मंडळ, या संस्थेने काटकळंबा हे गाव पाणलोट विकासासाठी निवडले आहे. येथे नाबार्ड आणि अॅटलास कॉपको यांच्या अर्थ साहाय्यतून संस्थेने अनेक कामे केली आहेत. पाणलोट आणि त्यामुळे झालेला शेती पद्धतीमध्ये बदल, गावकऱ्यांचा झालेला फायदा, महिला सक्षमीकरण, उद्योग वाढ, सामाजिक, आर्थिक आणि शेती बदल याच कामांची दखल घेऊन एस. पी. जैन, मुंबई यांनी संस्थेला सोशल इम्पॅक्ट अॅवॉर्डने सन्मानित केले आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

NAFED Mismanagement: पणनमंत्र्यांकडून ‘नाफेड’ची झाडाझडती

Banana Market: खानदेशात केळीची आवक घटू लागली

Agriculture Growth Rate: भारताचा कृषी विकासदर जागतिक स्तरावर सर्वाधिक

Maharashtra Heavy Rain: राज्यात पावसामुळे खरिपाची दाणादाण

Maharashtra Rain Alert: राज्यात विजांसह पावसाचा अंदाज

SCROLL FOR NEXT