Amravati News: राज्यात अंड्याच्या मागणीत झालेल्या वाढीमुळे पुन्हा एकदा दरात लक्षणीय तेजी नोंदविण्यात आली आहे. सध्या अंड्याचे व्यवहार शेकड्याला सुमारे ७५० रुपये दराने सुरू आहेत. काही दिवसांपूर्वी हेच दर प्रथम ७०० रुपये, त्यानंतर घसरून ६३० रुपयांपर्यंत आले होते. मात्र आता मागणी वाढल्याने दराने पुन्हा उसळी घेतली आहे..महाराष्ट्राची रोजची अंड्यांची गरज सुमारे एक कोटी अंडी इतकी आहे. ही गरज स्थानिक उत्पादनातून पूर्ण होत नसल्यामुळे राज्यात आंध्र प्रदेश व तेलंगणा येथून मोठ्या प्रमाणावर अंड्यांची आवक होते. बाहेरील राज्यांवर अवलंबून राहावे लागत असल्याने दरांवर त्याचा परिणाम जाणवत आहे..Eggs Rate: अंडी दर पोहोचले ७०० रुपये शेकड्यावर.दरम्यान, हिवाळ्यात अंड्यांची मागणी वाढते, असा अनुभव व्यापाऱ्यांकडून व्यक्त केला जात आहे. थंडीच्या दिवसांत आरोग्याच्या दृष्टीने अंड्यांचा वापर वाढतो, त्यामुळे दरवाढीचा कल दिसून येतो. आगामी दिवसांत मागणी कायम राहिल्यास अंड्याच्या दरात आणखी चढ-उतार होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे..अफवांमुळे दरात घसरणअंडी सेवनाबाबत नजीकच्या काळात सोशल मीडियावरून काही अफवा पसरविण्यात आल्या होत्या. कमी दरात अंड्यांची उपलब्धता व्हावी याकरिता व्यापाऱ्यांकडूनच अशा प्रकारची नीती अवलंबली जाते, असे पोल्ट्री व्यावसायिकांनी सांगितले. या माध्यमातून कमी दरात अंडी खरेदी करून त्यानंतर दरवाढीचा फायदा मिळविण्याचा उद्देश साधता येतो..Eggs Price: फंडा अंडा दराचा!.या वेळी देखील सोशल मीडियावर अफवा पसरवीत व्यापाऱ्यांनी दर पाडले. मात्र शासनाने या संदर्भातील अफवा खोटी असल्याचे सांगत अंड्यांचा आरोग्यावर कोणताही विपरीत परिणाम होत असल्याचे जाहीर केले. परिणामी, पुन्हा मागणीत वाढ झाली आहे, असे मातोश्री पोल्ट्रीचे संचालक रवींद्र मेटकर यांनी सांगितले..थंडीच्या दिवसांत अंड्यांना मागणी वाढते असा अनुभव आहे. त्यानुसार दर ७०० रुपये प्रति शेकड्यावर पोहोचले होते. त्यानंतर सोशल मीडियावर काही अफवा पसरविण्यात आल्या. त्यामुळे दरात घसरण नोंदवली गेली. शासनाने या संदर्भात खुलासा केल्यानंतर आता दराने पुन्हा उसळी घेतली आहे. रवींद्र मेटकर, पोल्ट्री व्यावसायिक, अमरावती.ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.