Ahilyanagar News: राज्यात यंदा रब्बी हंगामात पीकविमा योजनेत शेतकऱ्यांचा सहभाग मोठ्या प्रमाणात कमी झाला आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा केवळ २५ टक्के क्षेत्राचा विमा उतरला आहे. एक रुपयात पीकविमा योजना बंद होणे हे या मागील प्रमुख कारण मानले जात आहे..रब्बीची आतापर्यंत ४९ लाख ७३ हजार ६१६ लाख हेक्टरवर पेरणी झाली आहे. रब्बी पीकविमा योजनेत ७ लाख ८५ हजार २२१ हजार शेतकऱ्यांनी सहभाग घेतला असून, १३ लाख ५७ हजार ७६१ अर्जांच्या माध्यमातून १० लाख २७ हजार ८४० हेक्टर क्षेत्राचा पीकविमा उतरवला आहे. गतवर्षी रब्बीत २८ लाख ४६ हजार ६९ शेतकऱ्यांनी ३९ लाख ४४ हजार १९० हेक्टर क्षेत्राचा विमा उतरवला होता..Rabi Crop Insurance: तेत्तीस हजार शेतकऱ्यांनी भरला ६४ कोटींचा विमा.त्या तुलनेत यंदा पंचवीस टक्के क्षेत्रावर विमा उतरवला असल्याचे विमा भरण्याची मुदत संपल्याच्या कालावधीनंतर स्पष्ट झाले आहे. पिकांचे आपत्तीने नुकसान झाले तर शेतकऱ्यांना भरपाई मिळावी यासाठी शासन पंतप्रधान पीकविमा योजना राबवत आहे. मागील काळात एक रुपयात पीकविमा योजना राबविण्यात आली. त्यामुळे योजनेत सहभाग वाढला होता. यंदा खरिपात मात्र एक रुपयात पीक सहभाग योजना बंद झाली. त्यामुळे सहभाग कमी झाल्याचे स्पष्ट झाले आहे..Rabi Crop Insurance: रब्बी पीकविम्याकडे शेतकऱ्यांची पाठ.सततच्या पावसामुळे वाफसा नसल्याने यंदा रब्बीच्या पेरणीला उशीर झाला. राज्यात रब्बीचे सरासरी क्षेत्र ५७ लाख ८० हजार ४१७ हेक्टर असून यंदा आतापर्यंत सरासरीच्या ४९ लाख ७३ हजार ६१६ लाख हेक्टरवर म्हणजेच ८६ टक्के पेरणी झाली आहे. यंदाही रब्बीसाठी पीकविमा योजना राबवली गेली. सहभागासाठीची ज्वारी पिकाची मुदत ३० नोव्हेंबरपर्यंत, तर गहू, हरभऱ्याला १५ डिसेंबरपर्यंत मुदत होती..भुईमुगाला ३१ मार्च अंतिम तारीख आहे. रब्बी हंगामात प्रामुख्याने ज्वारी, हरभरा, गहू, मका आणि कांदा ही प्रमुख पिके आहेत. गतवर्षी रब्बीत १६ हजार ८३६ कोटी रुपये संरक्षित झाले होते. यंदा ४ हजार २७१ कोटी ९० लाख रुपये संरक्षित झाले आहेत. राज्यात यंदा रब्बीत सर्वाधिक परभणी, बुलडाणा, जालना जिल्ह्यांत सर्वाधिक शेतकरी विमा योजनेत सहभागी झाले आहेत. रत्नागिरी, सिंधुदुर्ग, भंडारा, कोल्हापूर, पुणे, गोंदिया, गडचिरोली जिल्ह्यांत शेतकरी सहभाग कमी असल्याचे सांगण्यात आले..रब्बी पीकविम्यात जिल्हानिहाय सहभागी शेतकरी (कंसात विमा क्षेत्र हेक्टरमध्ये)अहिल्यानगर ः ३८ हजार १७६ (७४,०६१), अकोले ः ४७ हजार ६८० (४९,४२१), अमरावती ः १० हजार १७० (९,६५४), बीड ः ९० हजार ११० (१,७६,०३३), भंडारा ः १ हजार २० (९०६), बुलडाणा ः १ लाख १९ हजार ७६० (१,४८,७२९), चंद्रपूर ः ५ हजार ५९० (४,६४९), छत्रपती संभाजीनगर ः २६ हजार १५० (४८,७७२) धाराशिव ः ३९ हजार ४५० (५६,८९६), धुळे ः ५ हजार ९८० (६,४५१), गडचिरोली ः २७० (९६), गोंदिया ः ५७० (४२८), हिंगोली ः २५ हजार २७० (३५,८०७), जळगाव ः १५ हजार ७०० (१७,०३५), जालना ः ९० हजार ६६० (१,३२,८६५), कोल्हापूर ः २० (९०), .लातूर ः ८६ हजार ४८० (१,२३,६६५), नागपूर ः ४ हजार ४४० (४२३१), नांदेड ः ७९ हजार ४१० (१,१७,४०५), नंदुरबार ः ८१० (७०३), नाशिक ः २७ हजार ९१० (३९,६०५), परभणी ः १ लाख ४१ हजार ४६० (१,९३,२४१), पुणे ः १ हजार ७५० (३,६६५), रत्नागिरी ः ०, सांगली ः ३४ हजार ५९० (६०,६८५), सातारा ः १ हजार ९७० (५,४६९), सिंधुदुर्ग ः १० (१७), सोलापूर ः ६५ हजार १४० (९२,२०८), वर्धा ः ९ हजार ८० (८,२३१), वाशीम ः २८ हजार ९१० (३२,५६८), यवतमाळ ः २९ हजार ३३० (३१,९०६)..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.