Biological Lab Agrowon
ताज्या बातम्या

Organic Farming : बांधावरील जैविक प्रयोगशाळा उभारण्यात वाशीम अग्रेसर

Agriculture News : सध्या रासायनिक खते व कीटकनाशकांच्या असंतुलित वापरामुळे मातीच्या सुपिकतेचा प्रश्‍न दिवसेंदिवस बिकट होत आहे.

Team Agrowon

Washim News : सध्या रासायनिक खते व कीटकनाशकांच्या असंतुलित वापरामुळे मातीच्या सुपिकतेचा प्रश्‍न दिवसेंदिवस बिकट होत आहे. जमिनीत क्षारता वाढली आहे. पिकांच्या उत्पादकतेसोबतच पोषणमूल्ये कमी होत आहेत.

अशा समस्यांवर उपाय शोधण्यासाठी वाशिम जिल्ह्यात शेतकरी यासाठी पुढे आले आहेत. शेतीत रासायनिक घटकांचा वापर कमी करून ते जैविक पदार्थांचा वापर वाढवू लागले आहेत. जिल्ह्यात सुमारे २० जैविक प्रयोगशाळा शेतकऱ्यांच्या पुढाकारातून उभ्या राहिल्या आहेत.

शेतकऱ्यांना बांधावरील प्रयोगशाळा उभारण्यासाठी मानव विकास मिशन आणि कृषी विभागाचा पुढाकार फायदेशीर ठरत आहे. त्यामुळे गेल्या काही वर्षात शेतकऱ्यांच्या शेतबांधावर २० प्रयोगशाळा उभ्या राहिल्या.

सुमारे साडे सहा हजार शेतकरी या शेती शाळांसोबत जुळले आहेत. आतापर्यंत १३ प्रयोगशाळांमधून ३७ लाख रुपयांच्या जैविक कृषी निविष्ठांची विक्रीसुद्धा करण्यात आली आहे. प्रयोगशाळेत तयार केलेल्या २६०४ लिटर ट्रायकोडर्मा आणि ६ हजार ८८० लिटर कडधान्य स्लरीचा शेतकऱ्यांनी वापर करून जैविक शेतीकडे वाटचाल सुरु केली आहे.

जिल्ह्यातील जय किसान शेतकरी गट (एरंडा), कृषिरत्न शेतकरी उत्पादक कंपनी (डोंगरकिन्ही), जय हनुमान शेतकरी बचतगट (अटकळी), अडबनेश्वर शेतकरी बचतगट (सावरगांवजिरे), वाशीम कृषी विकास शेतकरी उत्पादक कंपनी (अडोळी), योगायोग जैविक शेती मिशन फार्मर प्रोड्युसर कंपनी (बाभूळगाव),

अर्थवर्म ऑरगॅनिक शेतकरी उत्पादक कंपनी (अनसिंग), पतंजली सेंद्रिय शेतकरी गट (नेतंसा), महाविदर्भ फार्मर प्रोड्युसर कंपनी (वाकद), नाथांजली शेतकरी गट (डव्हा), जय पुंडलिक महाराज सेंद्रिय शेतकरी गट (बेलोरा),

मालेगाव तालुका फार्मर प्रोड्युसर कंपनी (मालेगाव) व कृषिधन शेतकरी बचतगट हे बांधावरील प्रयोगशाळेतून ट्रायकोडर्मा, सीविड ग्रॅनुल, कडधान्य स्लरीची व दाणेदार खते या नैसर्गिक कृषी निविष्ठांची निर्मिती करू लागले आहेत.

प्रयोगशाळेत तयार केलेली स्लरी पुणे, नगर व धाराशिव जिल्ह्यांतील शेतकऱ्यांनी द्राक्ष व डाळिंब पिकांवर वापरल्याने रोगांना अटकाव करणे शक्य झाले आहे. विशेषतः: डाळिंब, तूर व हरभरा पिकांवरील मर रोगला प्रतबंध करता येत आहे. जिवाणुयुक्त खते बांधावरच्या प्रयोगशाळेत अर्ध्या किमतीत रुपयांत उपलब्ध होतात. त्यामुळे जैविक कृषी निविष्ठांच्या खरेदीत ७५ टक्के खर्च वाचतो.

प्रयोगशाळांचे मॉडेल तीन प्रकारचे

शेत बांधावरील प्रयोगशाळेसाठी लागणारे साहित्य व त्याचा खर्च दोन लाखांच्या आसपास आहे. यामध्ये सुद्धा तीन प्रकारचे मॉडेल आहेत. छोटे मॉडेल २५ ते ३० हजारांचे आहे. शेतकरी घरीसुद्धा शेतीसाठी मॉडेल विकसित करू शकतो. मध्यम मॉडेल एक लाखात होते.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Kharif Sowing Planning: दारव्हा तालुक्यात ६९ हजार हेक्टरवर खरिपाचे नियोजन

Illegal HTBT Cotton Seeds: वर्ध्यात एचटीबीटी कापूस बियाण्यांचा साठा जप्त

El Nino Preparedness Guidance: ‘एल निनो’वर मात करण्यासाठी समन्वयाची गरज : प्रा. डॉ. इंद्र मणी

Agriculture Inputs Shortage: कृषी निविष्ठा विक्रेत्यांकडून युरिया, डीएपीची कृत्रिम टंचाई

BBF Planter: वेळ, मजुरी आणि खर्चात बचत करणारे बीबीएफ पेरणी यंत्र

SCROLL FOR NEXT