Maharashtra Budget Session 2023
Maharashtra Budget Session 2023 Agrowon
ताज्या बातम्या

Maharashtra Budget Session : शेतकऱ्यांवरील लाठीहल्ला सरकारपुरस्कृत होता का?

Team Agrowon

बाळासाहेब पाटील ः ॲग्रोवन वृत्तसेवा

Maharashtra Budget Session मुंबई : हरभरा खरेदीच्या (Chana Procurement) ऑनलाइन नोंदणीसाठी जमलेल्या शेतकऱ्यांवर लाठीहल्ला सरकारपुरस्कृत होता का? सरकारने तसे आदेश दिले का? जर दिले नसतील तर लाठीहल्ला (Lathi Charge On Farmer) करणाऱ्या पोलिस अधिकाऱ्यांवर तातडीने कारवाई करावी, अशी मागणी करत विरोधकांनी विधानसभेतून सभात्याग केला.

काँग्रेसच्या नाना पटोले यांनी दिलेला स्थगन प्रस्ताव नाकारल्यानंतर पटोले यांनी हा मुद्दा मांडला. तसेच विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) यांनीही या प्रकरणातील आणि स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर यांच्यावर लाठीहल्ला करणाऱ्या दोषी अधिकाऱ्यांवर तातडीने कारवाई करावी, अशी मागणी केली.

नाना पटोले म्हणाले, ‘‘नाफेडमार्फत हरभरा खरेदीसाठी ऑनलाइन नोंदणी सुरू करण्यात आली आहे. या नोंदणीसाठी शेतकरी केंद्रांवर जमले. मात्र, या शेतकऱ्यांवर पोलिसांनी लाठीहल्ला केला आहे. हुकूमशाही आहे का याचे उत्तर सरकारला द्यावे लागेल. शेतकरी ऊन, वारा, पावसाची तमा न बाळगता पीक घेतो.

जगाचा पोशिंदा असलेल्या शेतकऱ्याने आपल्या मालाला भाव मिळावा, अशी मागणी करणे चुकीचे आहे का? पोलिसांनी लाठीहल्ला कुणाच्या सांगण्यावरून केला. ही हुकूमशाही आहे का? लाठीहल्ला करण्यासाठी तुमचा हुकूम होता का? हे सभागृहाला कळले पाहिजे,’ अशी मागणी केली.

यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी, ‘‘शेतकऱ्यांच्या तोंडाला पाने पुसण्याचे काम कुणी केले हे माहीत आहे. आम्ही शेतकऱ्यांच्या मागे खंबीरपणे उभे राहिलो. शेतकऱ्यांना १२ हजार कोटी रुपये दिले आहेत.

सततच्या पावसामुळे झालेल्या नुकसानीपोटी आम्ही नियमाबाहेर जाऊन पैसे दिले आहेत.’’ असे सांगताच विरोधकांनी आक्षेप घेत गोंधळ घातला. दोन्ही बाजूचे आमदार आक्रमक झाले. त्यानंतर विरोधकांनी सभात्याग केला.

हीच का लोकशाही : अजित पवार

रविकांत तुपकर यांच्यावरील हल्लाप्रकरणाचा दाखला देत विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी सत्ताधाऱ्यांना धारेवर धरले.

हीच का लोकशाही? असे विचारत तुपकर हे लोकशाही मार्गाने आंदोलन करत असताना त्यांना बेदम मारहाण झाली.

ते रुग्णालयात दाखल असताना त्यांना भेटू दिले जात नाही, ही कुठली पद्धत आहे, असा सवाल केला.

पवार म्हणाले, की सोयाबीन व कापसाला दरवाढ मिळावी, यासह शेतकऱ्यांच्या अनेक मागण्यांसाठी शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर यांनी आत्मदहनाचा इशारा दिलेला होता.

शांततेने, अहिंसक मार्गाने सुरु असलेल्या आंदोलकांवर पोलिसांनी बेछूट लाठीहल्ला केला. आंदोलक शेतकऱ्यांवर लाठीचार्ज करणाऱ्या पोलिसांवर आणि आदेश देणाऱ्या पोलिस अधिकाऱ्यावर चौकशी करून तातडीने कारवाई करावी.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Kharif Sowing : सांगली जिल्ह्यात अडीच लाख हेक्टरवर होणार खरिपाचा पेरा

Jal Jivan Mission : निधी खर्च केला, पण गावांत पाणीच नाही

Maharudra Mangnale : कडूनिंबांशी दोस्ती ! : महारुद्र

Illegal Cotton Seed : ३१ लाखांचे अवैध एचटीबीटी कापूस बियाणे जप्त

Food Safety India : एफएसएसएआयचा 'कॅल्शियम कार्बाइड'च्या वापराबाबत इशारा; वापर टाळण्याच्या केल्या सूचना

SCROLL FOR NEXT