Ashadhi Wari 2023 :  Agrowon
ताज्या बातम्या

Ashadhi Wari 2023 : आषाढीसाठी पंढरपुरात वारकऱ्यांचा महामेळा

Ashadhi Wari : टाळ-मृदंगाचा गजर आणि हरिनामाच्या जयघोषाने अवघी पंढरी दुमदुमून गेली. चंद्रभागेतील स्नान आणि नगर प्रदक्षिणेसाठी वारकऱ्यांची दिवसभर रेलचेल राहिली.

Team Agrowon

Pandharpur Wari : ॲग्रोवन वृत्तसेवा पंढरपूर, जि. सोलापूर ः ‘पंढरीचा वास, चंद्रभागे स्नान आणिक दर्शन विठोबाचे’ हा भाव मनात ठेवत आषाढी यात्रेच्या सोहळ्यात सहभागासाठी राज्याच्या कानाकोपऱ्यातून सुमारे सात लाखांहून अधिक वारकरी गुरुवारी (ता.२९) पंढरपुरात दाखल झाले.

टाळ-मृदंगाचा गजर आणि हरिनामाच्या जयघोषाने अवघी पंढरी दुमदुमून गेली. चंद्रभागेतील स्नान आणि नगर प्रदक्षिणेसाठी वारकऱ्यांची दिवसभर रेलचेल राहिली.

आषाढीच्या मुहूर्तावर चंद्रभागेतील स्नानाचा पर्वकाळ साधण्यासाठी वारकऱ्यांची धावपळ सुरु होती.

हा सोहळा ‘याची देहि याची डोळा’ अनुभवण्यासाठी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यांसह शेजारील तेलंगणा, आंध्रप्रदेश आणि कर्नाटकमधूनही वारकरी पंढरीत दाखल झाले आहेत.

शहरातील विविध मंदिरे, मठ, धर्मशाळा आणि वारकऱ्यांच्या राहुट्यांमध्ये कीर्तने, प्रवचने आणि भजने सुरु आहेत.

विठ्ठल मंदिर परिसर, प्रदक्षिणामार्ग, ६५ एकर, चंद्रभागा वाळवंट, गोपाळपूर रस्त्यावरील पत्राशेड, भक्तिमार्ग, कैकाडी महाराज मठ, तनपुरे महाराज मठ, रेल्वेस्टेशन परिसरात वारकऱ्यांची सर्वाधिक गर्दी आहे.

ज्ञानोबा-तुकारामाचा जयघोष आणि टाळ-मृदंगाच्या गजराने प्रदक्षिणा मार्गासह चंद्रभागा तीराकडे निघालेल्या दिंड्या आणि वारकऱ्यांच्या भजनांमुळे एक वेगळे चैतन्य आणि उत्साह वारीमध्ये दिसतो आहे.


ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Farm Loan Waiver: शेतकऱ्यांना कर्जमाफी ५ जुलैनंतरच, अटी, निकषांमध्ये बदल, कृषिमंत्री भरणेंची विधानसभेत घोषणा

Turmeric Cultivation: जळकोट तालुक्यात शेतकऱ्यांची हळद लागवडीची लगबग

Agriculture Awards: नांदेडमधील चार शेतकऱ्यांना राज्यस्तरीय कृषी पुरस्कार जाहीर

Wildlife Management: जाळी लावून रोखला वन्यप्राण्यांचा उपद्रव

Smart Electricity Meter : वादातही सोलापूर मंडळात ४.१७ लाख स्मार्ट मीटर

SCROLL FOR NEXT