Weather UPdate Agrowon
ताज्या बातम्या

Weather Update : राज्यात गुलाबी थंडीची प्रतीक्षा

मॉन्सून परतल्यानंतर किमान तापमानात घट झाल्याने राज्यात थंडीची चाहूल लागली. मात्र त्यानंतर किमान तापमानात सातत्याने चढ-उतार सुरू असल्याचे दिसून आले.

टीम ॲग्रोवन

पुणे : मॉन्सून (Mosnoon) परतल्यानंतर किमान तापमानात (Temperature) घट झाल्याने राज्यात थंडीची (Winter) चाहूल लागली. मात्र त्यानंतर किमान तापमानात सातत्याने चढ-उतार सुरू असल्याचे दिसून आले. राज्यात अद्यापही गुलाबी थंडीची (Cold Weather) प्रतीक्षा आहे. शुक्रवारी (ता. ११) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये निफाड येथील गहू संशोधन केंद्र येथे ११.६ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली.

Soybean

राज्यात पहाटे काहीसा गारठा आणि दुपारी उन्हाचा चटका ही स्थिती कायम आहे. पहाटेच्या वेळी गारठा, धुके आणि दव पडत आहे. राज्याच्या किमान तापमानाबरोबरच कमाल तापमानातही चढ-उतार सुरू आहेत. शुक्रवारी (ता. ११) राज्यात निरभ्र आकाशासह उन्हाचा चटका कायम होता.

राज्यात कमाल किमान तापमानातील तफावत कायम आहे. किमान तापमान १२ ते २१ अंशांच्या दरम्यान, तर कमाल तापमान ३० ते ३५ अंशांच्या आसपास आहे. आज (ता. १२) राज्यात कोरड्या हवामानासह तापमानातील चढ-उतार कायम राहण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.

तमिळनाडूच्या किनाऱ्यावर ठळक कमी दाब क्षेत्र

नैॡत्य बंगालच्या उपसागरात ईशान्य श्रीलंका आणि तमिळनाडूच्या किनाऱ्यालगत शुक्रवारी (ता. ११) ठळक कमी दाबाचे क्षेत्र सक्रिय होते. वायव्येकडे सरकत असलेली ही प्रणाली शनिवार सकाळपर्यंत (ता. १२) तमिळनाडू आणि पद्दूचेरीच्या किनारपट्टीकडे पार करणार असून, त्यानंतर रविवारपर्यंत (ता. १३) केरळ अरबी समद्राकडे जाण्याची शक्यता आहे. आग्नेय बंगालच्या उपसागरात १६ नोव्हेंबरपर्यंत नवीन कमी दाबाचे क्षेत्र तयार होण्याचे संकेत आहे.

शुक्रवारी (ता. ११) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये राज्यात विविध ठिकाणी नोंदले गेलेले कमाल तापमान, कंसात किमान तापमान. (अंश सेल्सिअसमध्ये) :

पुणे ३०.६ (१२.८), नगर ३१ (१५.३), जळगाव - (१४.६), धुळे ३२ (१२), कोल्हापूर ३१.१ (१७.३), महाबळेश्‍वर २४.१(१३.६), नाशिक २९.६ (१३.८), निफाड ३२.२ (११.६), सांगली ३१.९ (१७.४), सातारा ३१ (१५.६), सोलापूर ३२.४ (१५.४), सांताक्रूझ ३४.८ (२१), डहाणू ३२.८ (२०.६), रत्नागिरी ३४.८ (२१), औरंगाबाद ३०.५ (१४), नांदेड ३३.२ (१७.२), उस्मानाबाद ३०.५ (१३.८), परभणी ३०.६ (१६), अकोला ३३ (१७.२), अमरावती ३२.६ (१५.३), बुलडाणा ३०.४ (१८.३), ब्रह्मपुरी ३२.२ (१७.४), चंद्रपूर ३०.४ (१८.३), गडचिरोली ३१.६ (१५.८), गोंदिया ३०.४(१६.२), नागपूर ३१.६ (१७), वर्धा ३१.२(१७.४), वाशीम - (१७.२), यवतमाळ ३१.५ (१५.५).

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Farmer Loan Waiver: कर्जमाफीसाठी आणखी ३ हजार कोटींचा निधी मंजूर; शासन निर्णय प्रसिद्ध

Electricity Transformer Problems: दुष्काळात सिंचनासाठी धडपड; वीजपुरवठ्याच्या अडचणी कायम

Farmers Protest: ऊस एफआरपी, साखरेच्या एमएसपी प्रश्नी महाराष्ट्र, कर्नाटकातील शेतकरी आक्रमक, केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशींच्या घरासमोर आंदोलन

Farmer Protest: करपलेल्या सोयाबीनसह शासन निर्णयाची स्वाभिमानीकडून होळी

Irrigation Power Supply: एक आठवडा दिवसा, तर एक आठवडा रात्री वीजपुरवठा

SCROLL FOR NEXT