Vasantrao Naik Award  Agrowon
ताज्या बातम्या

Agriculture Award : वसंतराव नाईक कृषी गौरव पुरस्कार जाहीर

Announcement of Vasantrao Naik Krishi Gaurav Award : या समारंभाच्या अध्यक्षस्थानी कृषिमंत्री धनंजय मुंडे राहतील. या कार्यक्रमात महाराष्ट्रातील कर्तबगार व प्रयोगशील शेतकरी व कृषी शास्त्रज्ञ यांना मान्यवरांच्या हस्ते वसंतराव नाईक कृषी गौरव पुरस्कार प्रदान करण्यात येईल.

Team Agrowon

वसंतराव नाईक स्मृती प्रतिष्ठान, पुसदच्या वतीने हरितक्रांतीचे प्रणेते, महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री के. वसंतराव नाईक यांच्या ४४ व्या स्मृतिदिनी बाबासाहेब नाईक अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या सुधाकरराव नाईक प्रेक्षागृहात

१८ ऑगस्ट २०२३ रोजी दुपारी १२:१५ वाजता वसंतराव नाईक कृषी गौरव पुरस्कार प्रदान सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे.

या समारंभाच्या अध्यक्षस्थानी कृषिमंत्री धनंजय मुंडे राहतील. या कार्यक्रमात महाराष्ट्रातील कर्तबगार व प्रयोगशील शेतकरी व कृषी शास्त्रज्ञ यांना मान्यवरांच्या हस्ते वसंतराव नाईक कृषी गौरव पुरस्कार प्रदान करण्यात येईल. शाल, श्रीफळ, स्मृती मानचिन्ह व प्रशस्तिपत्र असे पुरस्काराचे स्वरूप आहे, अशी माहिती प्रतिष्ठानचे अध्यक्ष दीपक आसेगावकर यांनी शनिवार (ता. १२) पत्रकार परिषदेत दिली.

पुरस्कार प्राप्त शेतकरी....

पश्‍चिम महाराष्ट्र विभाग

- कपिल जयप्रकाश जाचक, जाचकवस्ती, ता. इंदापूर, जि. पुणे (केळी पीक)

- बजरंग सदाशिव साळुंखे, बामणी, ता. सांगोला, जि. सोलापूर (ड्रॅगन फ्रूट)

मराठवाडा विभाग :

- बाबासाहेब नारायण पडूळ, लाडसावंगी, जि. छत्रपती संभाजीनगर

(शेडनेट, भाजीपाला व फळबाग)

- अनिल तुळशीराम शेळके, कुंभेफळ, जि. छत्रपती संभाजीनगर (दुग्ध व्यवसाय)

उत्तर महाराष्ट्र

- विश्‍वासराव आनंदराव पाटील, लोहारा, ता. पाचोरा, जि. जळगाव (कोरडवाहू शेतीचे मॉडेल)

- महेंद्र निंबा परदेशी, कुसुंबा, ता. जि. धुळे (कांदा पीक)

कोकण

- संदीप बबन कांबळे, खानू, जि. रत्नागिरी (भात उत्पादक)

- मिथिलेश हरिश्‍चंद्र देसाई, लांजा, जि. रत्नागिरी (फणस फळबाग)

विदर्भ विभाग :

- रवींद्र जयाजी गायकवाड, गायवड, ता. कारंजा, जि. वाशीम (सेंद्रिय खपली गहू व शेतीपूरक व्यवसाय)

- अनिल शिवलाल किरणापुरे, लवारी, ता. साकोली, जि. भंडारा (भात व भाजीपाला उत्पादक)

महिला शेतकरी :

- सविता वैभव नालकर, रा. चिंचविहिरे, ता. राहुरी, जि. नगर (शेततळ्यातील मत्स्यपालन)

कृषी शास्त्रज्ञ

- डॉ. दिगंबर नभू मोकाट, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, पुणे (औषधी व सुगंधी वनस्पती)

विशेष सन्मान

- डॉ. दिनेश राठोड, चरित्र लेखक, मलकापूर, जि. बुलडाणा (वसंतराव नाईक यांच्या राजकीय व कृषी औद्योगिक क्रांतीवर हिंदी व इंग्रजी भाषेत लेखन)

दुपारच्या सत्रात तीन वाजता जी. सी. मेश्राम, (व्याख्याता, बांबू प्रशिक्षण व संशोधन केंद्र, चंद्रपूर) बांबू पिकावर मार्गदर्शन करतील. या वेळी सत्कारमूर्ती शेतकऱ्यांचे अनुभवकथन होईल.

वसंतराव नाईक स्मृती दिन सोहळ्याचे स्वागताध्यक्ष, माजी राज्यमंत्री डॉ. एन. पी. हिराणी, माजी मंत्री मनोहर नाईक, माजी आमदार विजय पाटील चोंढीकर, माजी राज्यमंत्री अविनाश नाईक, प्रा. गोविंद फुके, आमदार नीलय नाईक, आमदार इंद्रनील नाईक यांच्या मार्गदर्शनात सोहळ्याची जय्यत तयारी करण्यात आली आहे.

या सोहळ्याला उपस्थित राहण्याचे आवाहन प्रतिष्ठानचे अध्यक्ष, कृषिभूषण दीपक आसेगावकर, उपाध्यक्ष धनंजय सोनी, कोशाध्यक्ष जय नाईक, सचिव प्रा. डॉ. उत्तम रुद्रवार व पुरस्कार निवड समिती प्रमुख श्री. ययाती मनोहरराव नाईक यांनी केले आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Maharashtra Monsoon Rain: मराठवाड्यात पावसाचा जोर कमीच; पूर्व विदर्भ आणि कोकणात पुढील ४ दिवस जोरदार पावसाचा अंदाज

Agrowon Podcast: गव्हाचे भाव स्थिरावले; डाळिंब तेजीत, मुग दबावात, केळीच्या दरात वाढ, उडदाचे भाव स्थिर

ZP School Admission : बोराखेडी जिल्हा परिषद शाळेत प्रवेश ‘ॲडमिशन फुल्ल’

Tree Plantation : जैवविविधता जपण्यासाठी वृक्षारोपण गरजेचे

Farmers Welfare: बच्चू कडू यांच्या मागण्यांना सरकारचा सकारात्मक प्रतिसाद; शेतकरी,मजुरांसाठी आश्वासने

SCROLL FOR NEXT