Agriculture Award : आत्मांतर्गत प्रयोगशील शेतकऱ्यांसह कृषी विकास साधणाऱ्या घटकांचा सन्मान होणार

Atma Yojana Maharashtra : कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणेंतर्गत कृषी क्षेत्रात नावीन्यपूर्ण व प्रयोगशील काम करणाऱ्या शेतकऱ्यांना व शेतकरी गटांना प्रोत्साहन देण्यासाठी उत्कृष्ट शेतकरी, शेतकरी गट पुरस्कारासाठी अर्ज करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
Department of Agriculture
Department of AgricultureAgrowon
Published on
Updated on

Farmer Award : कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा (आत्मा), नाशिक यांच्यामार्फत दरवर्षी कृषी क्षेत्रात नावीन्यपूर्ण व प्रयोगशील काम करणाऱ्या शेतकऱ्यांना व शेतकरी गटांना प्रोत्साहन देण्यासाठी उत्कृष्ट शेतकरी, शेतकरी गट पुरस्कार असे दोन पुरस्कार दिले जात होते. २०२३-२४ वर्षात या पुरस्कारांच्‍या वर्गवारीत वाढ करण्यात आली असून या विविध पुरस्कारांसाठी शेतकरी, शेतकरी गट, शेतकरी उत्पादक कंपनी, कृषी विस्तारक व कृषी उद्योजक यांना अर्ज करण्याचे आवाहन कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणेचे प्रकल्प संचालक राजेंद्र निकम यांनी केले.

Department of Agriculture
Innovative Farmer Award : अंकुश पडवळे यांना केंद्राचा नावीन्यपूर्ण शेतकरी पुरस्कार

विविध पुरस्कारांच्या अर्जांच्या अधिक माहितीसाठी इच्छुकांनी तालुका कृषी अधिकारी, तालुका तंत्रज्ञान व्यवस्थापक/सहायक तंत्रज्ञान व्यवस्थापक यांच्याशी संपर्क साधावा, असेही निकम यांनी कळविले आहे. इच्छुकांनी १५ ऑगस्टपर्यंत आपले अर्ज सादर करावेत, असे कळविण्यात आले.

पुरस्कार व त्यासाठीच्या अटी-शर्ती :

उत्कृष्ट वैयक्तिक शेतकरी : जे शेतकरी शेतात आधुनिक, सुधारित तंत्रज्ञानाचा वापर करून शेतीमध्ये नावीन्यपूर्ण प्रयोग करतात. परिसरातील शेतकऱ्यांनादेखील असे करण्यास प्रवृत्त करतात. परिसरातील प्रगतिशील शेतकरी आहेत.

उत्कृष्ट शेतकरी गट : ‘आत्मा’ संस्थेअंतर्गत नोंदणीकृत असलेला शेतकरी गट शेती व शेतीसंलग्न कामकाज करणारा असावा. गट आत्मा संस्थेकडे नोंदणीकृत असावा. तसेच गटामध्ये समन्वय, ऐक्य, नियमित सभा, शेती आधारित प्रक्रिया उद्योग करणारा असून स्वावलंबी असावा.

Department of Agriculture
Sahyadri Farms : सह्याद्री फार्म्सचे विलास शिंदे यांना डॉ. सी. डी. मायी कृषितज्ज्ञ पुरस्कार

उत्कृष्ट शेतकरी उत्पादक कंपनी : कृषी व कृषी सलंग्न क्षेत्रात काम करणारी कंपनी असावी. कंपनीचे सभासद संख्या कंपनीला होणारा नफा, गुणवत्तापूर्ण उत्पादने, तसेच कंपनीचे सामाजिक क्षेत्रात असलेले काम, नियमीत सभा, वार्षिक उलाढाल इ. बाबींमध्ये नेत्रदीपक कामगिरी आवश्यक आहे. तसेच कंपनी शेतकऱ्यांसाठी राबवित असलेले उपक्रम यानुसार परिपूर्ण असलेली शेतकरी उत्पादक कंपनी असावी.

उत्कृष्ट कृषी विस्तारक : कृषी विस्तार क्षेत्रात कार्यरत असलेले शासकीय अधिकारी/कर्मचारी, कृषी विद्यापीठ, कृषी विज्ञान केंद्रांमधील कृषी विस्तारक, कृषी विस्तार कार्यात कार्यरत पत्रकार ज्यांनी विस्तार कार्यात सलग तीन वर्षे काम केले.

उत्कृष्ट कृषी उद्योजक : कृषी व कृषी संलग्न क्षेत्रात व्यवसाय उद्योग उभारून शेतकऱ्यांना त्याचा लाभ देणारे उद्योजक यासाठी अर्ज करू शकतात. उभारलेल्या उद्योग व्यवसायातून कृषी तसेच सामाजिक क्षेत्रात चांगले काम केले. तसेच नवीन कृषी उद्योजक यांना प्रोत्साहन देणारे उद्योजक अर्ज करू शकतात.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com