rabi Season Agrowon
ताज्या बातम्या

Rabi Seeds : ‘वनामकृवी’चे रब्बीचे बियाणे औरंगाबादेत विक्रीसाठी उपलब्ध

विभागीय कृषी विस्तार शिक्षण केंद्राची माहिती

टीम ॲग्रोवन

औरंगाबाद : वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ (Vasantrao naik marathwada vidyapeeth) परभणीच्या रब्बी बियाणे (Rabi Season) विक्रीचा प्रारंभ शुक्रवारी (ता. ३०) भारतीय कृषी अनुसंधान परिषदेचे डीडीजी डॉ. टी. आर. शर्मा (Dr. T.R. Sharma)आणि एडिजी डॉ. आर. के. सिंग (Dr. R.K. Singh) यांचे हस्ते करण्यात आला.

यावेळी वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाचे संचालक संशोधन डॉ. दत्तप्रसाद वासकर, संचालक विस्तार शिक्षण डॉ. देवराव देवसरकर, सहयोगी संचालक बियाणे डॉ. के. एस. बेग यांची उपस्थिती होती. यावेळी कारभारी ठेंगंडे, लक्ष्मीनारायण जैस्वाल आणि नामदेवराव बोराडे या शेतकऱ्यांना मान्यवरांचे हस्ते रब्बी

ज्वारीचे सुपर मोती बॅग सुपूर्द करण्यात आल्या. मागील पाच वर्षांपासून पैठण रोडवरील विभागीय कृषी विस्तार शिक्षण केंद्रात, वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाच्यावतीने शेतकऱ्यांसाठी विक्री करण्यासाठी खरीप व रब्बी हंगामात बियाणे उपलब्ध

होत आहे. यंदा रब्बी हंगामासाठी ज्वारी, करडई, जवस आणि हरभरा या रब्बी पिकाच्या सुधारित वाणाचे बियाणे उपलब्ध झाले असल्याची माहिती यावेळी बियाणे विक्री व्यवस्था पाहणारे विभागीय कृषी विस्तार शिक्षण केंद्राचे रामेश्वर ठोंबरे यांनी दिली.

बियाणे विक्रीवेळी राष्ट्रीय कृषी संशोधन प्रकल्पाचे सहयोगी संचालक संशोधन डॉ. सूर्यकांत पवार, डॉ. किशोर झाडे, डॉ. संजय पाटील, राष्ट्रीय कृषी संशोधन प्रकल्प व कृषी विज्ञान केंद्राचे शास्रज्ञ व इतरांची उपस्थिती होती.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Farm Loan Waiver: कर्जमाफी योजनेची प्रत्यक्ष अंमलबजावणी सुरु, शेतकऱ्यांची पहिली यादी जाहीर

Pandharpur Vitthal Darshan: दर्शन रांगेतील वयोवृद्ध दांपत्याला थेट विठ्ठल दर्शन

Kharif Crop Insurance: शेतकऱ्यांची खरीप पीकविम्याकडे पाठ

Fake Soybean Seed Issue: बोगस बियाण्यांच्या तक्रारीवर उलट शेतकऱ्यांवरच प्रश्नांचा भडिमार

Agriculture Scheme Subsidy Issue: परभणी जिल्ह्यातील ६७० शेतकरी अद्यापही अनुदानाच्या प्रतीक्षेत

SCROLL FOR NEXT