Seed Treatment : बीजप्रक्रिया करूनच करा पेरणी

शेतकऱ्यांनी जमिनीतील पेरणीयोग्य वापसा पाहून व बीजप्रक्रिया करूनच पेरणी करावी असे आवाहन तालुका कृषी अधिकारी शिवाजी शिंदे यांनी केले आहे.
Crop Sowing
Crop SowingAgrowon
Published on
Updated on

सांगोला : सांगोला तालुक्यामध्ये रब्बी पिकाच्या (Rabi Sowing) पेरणीस सुरवात झाली असून यावर्षी तालुक्यात ५६ हजार ६०० हेक्टर क्षेत्रावर पेरणीचे नियोजन (Rabi Sowing Management) करण्यात आले आहे. शेतकऱ्यांनी जमिनीतील पेरणीयोग्य वापसा पाहून व बीजप्रक्रिया (Seed Treatment) करूनच पेरणी करावी असे आवाहन तालुका कृषी अधिकारी शिवाजी शिंदे (Shivaji Shinde)यांनी केले आहे.

Crop Sowing
Crop Damage : दौंडमधील पीक नुकसानीचे पंचनामे करण्याची मागणी

सांगोला तालुक्याचे सरासरी रब्बी पेरणीचे ४६ हजार ९५ हेक्टर क्षेत्र आहे. सध्या तालुक्यात अंदाजे २ हजार ५०० हेक्टर क्षेत्रावर पेरणी झाली आहे. यामध्ये रब्बी ज्वारी ३९ हजार ३२१ हेक्टर, मका ५ हजार २५७८ हेक्टर, गहू ६५९ हेक्टर, हरभरा ६०६ हेक्टर क्षेत्र आहे. तालुक्यात ज्वारी, गहू, मका, हरभरा या प्रमुख पिकांची पेरणी केली जाते.

Crop Sowing
Seeds And Fertilizers : बियाणे, खतांचा तुटवडा नाही

गतवर्षी रब्बी हंगामामध्ये ४८ हजार ९३२ हेक्टर क्षेत्रावर पेरणी झाली होती. यावर्षी रब्बी हंगामामध्ये ५६ हजार ६०० हेक्टर क्षेत्रावर पेरणीचे नियोजन केले आहे. यामध्ये ज्वारी ४० हेक्टर, मका ८ हजार ५००८ हेक्टर, गहू ३ हजार हेक्टर, हरभरा ३ हजार ६०० हेक्टर, करडई २५० हेक्टर, सूर्यफूल २५० हेक्टर क्षेत्रावर पेरणी अपेक्षित आहे.

Crop Sowing
Fertilizer : रासायनिक खतांची कार्यक्षमता वाढवण्यासाठी सिलिकॉन

तालुक्याचे सरासरी पर्जन्यमान ४६८.३ मिलिमीटर असून सध्या ३२१ मिलिमीटर म्हणजे ६८ टक्के पर्जन्यमान झाले आहे. तालुक्यामध्ये रब्बीच्या पेरणीस सुरवात केली आहे. शेतकऱ्यांनी जमिनीमध्ये पुरेसा ओलावा/वाफसा असताना बिजप्रक्रिया करूनच पेरणी करावी. रब्बी ज्वारीसाठी पेरणीपूर्वी प्रति किलो बियाणास ४ ग्रॕम गंधक (३०० मेश पोताचे) व थायमिथाॕक्झाम ३ ग्रॕम याप्रमाणे रासायनिक बिजप्रक्रिया करावी.

त्याचबरोबर २५ ग्रॕम अॕझोटोबॕक्टर व पि.एस.बी कल्चर प्रती किलो बियाणे याप्रमाणे जैविक बिजप्रक्रिया करावी.

पेरणीसाठी सुधारित वाणांचा वापर करावा. रब्बी ज्वारी पेरणीसाठी फुले रेवती, फुले सुचित्रा, मालदांडी ३५-१ , फुले वसुधा, परभणी मोती, परभणी ज्योती, परभणी क्रांती या सुधारित वाणांचा वापर करावा. बाजारामध्ये बियाणे व खते पुरेशा प्रमाणामध्ये उपलब्ध आहेत.

शेतकऱ्यांनी आधिकृत दुकानदारांकडूनच बियाणे, खते व किटकनाशके खरेदी करावेत. दुकानदाराकडून पक्के बिल घ्यावे. बॕग व लेबल जपून ठेवावे व बॅगवरील किमतीपेक्षा जादा रक्कम देऊ नये असे आवाहनही तालुका कृषी अधिकारी शिवाजी शिंदे यांनी केले आहे.

कृषी विभागातर्फे रब्बी पिकांच्या पेरणीसाठी सर्व नियोजन करण्यात आले आहे.

रब्बी पेरणीसाठी पुरेसे बियाणे व खते बाजारपेठेत उपलब्ध आहेत. शेतकऱ्यांनी जमिनीतील वापसा-ओलावा आहे का ते पाहणे तसेच बीजप्रक्रिया करणे महत्त्वाचे आहे. रब्बीच्या बियाणे, खते व इतर गोष्टींचे अडचणी आल्यास कृषी विभागाशी संपर्क करावा.

- शिवाजी शिंदे, तालुका कृषी अधिकारी, सांगोला.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com