Pulses Agrowon
ताज्या बातम्या

Crop Damage : कडधान्यासह आंबा पिकाला अवकाळी पावसामुळे धोका

काही दिवसांपासून जिल्‍ह्यातील हवामान ढगाळ आहे. बुधवारी पावसाने हजेरी लावल्याने शेतीसह वीटभट्टी व्यवसाय, कडधान्य शेती व आंबा बागायतदार चिंतेत आहेत.

टीम ॲग्रोवन

माणगाव ः काही दिवसांपासून जिल्‍ह्यातील हवामान ढगाळ (Cloudy Weather) आहे. बुधवारी पावसाने हजेरी लावल्याने शेतीसह वीटभट्टी व्यवसाय, कडधान्य शेती (Pulses) व आंबा बागायतदार चिंतेत आहेत. वातावरणात धुरकेही वाढले असून तालुक्यातील काही भागांत हलका पाऊस झाला आहे.

लांबलेल्या पावसाने वीटभट्टी व्यवसाय यंदा उशिराने सुरू झाला. मात्र आताच्या ढगाळ वातावरणामुळे, पावसामुळे पुन्‍हा व्यावसायावर संकट ओढावले आहे. तालुक्यात होणाऱ्या आंबा उत्पादनावरही परिणाम होण्याची शक्‍यता असून मोहर बाधित होण्याची भीती बागायतदारांकडून व्यक्‍त होत आहे.

ढगाळ वातावरणाचा अनुभव सर्वत्र येत असून प्रत्येक महिन्यात पाऊस पडत आहे. त्यामुळे कडधान्य पिकांसह सर्वच पिकांचे नुकसान होत आहे.- नारायण मोंडे, शेतकरी, माणगाव

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Shetkari Hakk Parishad: शेतकरी हक्कासाठी राज्यव्यापी आंदोलन उभारू

Onion Storage Policy: कांदा साठवणूक धोरणाचा मसुदा तयार : पाशा पटेल

Mera Resham Mera Abhiman: ‘मेरा रेशम, मेरा अभिमान’मध्ये महाराष्ट्राची आघाडी 

Donald Trump: ...तोपर्यंत भारताबरोबर व्यापार कराराबाबत चर्चा नाही : ट्रम्प

Infrastructure Development: पायाभूत सुविधा विकास प्रकल्पांची गतीने उभारणी करा

SCROLL FOR NEXT