Agrowon
ताज्या बातम्या

Rain : औरंगाबाद, जालना, बीड जिल्ह्यांत अवकाळी पाऊस

गत दोन दिवसांपासून मराठवाड्यातील औरंगाबाद, जालना, बीड या तीनही जिल्ह्यांतील काही ठिकाणी अवकाळी पावसाने हजेरी लावली आहे.

Team Agrowon

औरंगाबाद : गत दोन दिवसांपासून मराठवाड्यातील औरंगाबाद, जालना, बीड या तीनही जिल्ह्यांतील काही ठिकाणी अवकाळी पावसाने हजेरी लावली आहे. या पावसामुळे वेचणीला आलेला कापूस भिजला असून ढगाळ व प्रतिकूल वातावरणामुळे गहू, कांदा, तूर उत्पादक तसेच ताणावर असलेल्या फळबागांचे शेतकरी हवालदिल झाले आहेत.

औरंगाबाद जिल्ह्यात बुधवारी रात्री सावलदबारा, बनोटी, सोयगाव, जरंडी, हातनूर, फुलंब्री, वडोद बाजार, आळंद, पीरबावडा, बाबरा, ढोलकी टाकळी, राजेराय, कायगाव, विहामांडवा, चित्ते पिंपळगाव, निपाणी, आडगाव, भालगाव, आपतगाव, पाचोड, एकोड, लोहगाव, नागद परिसरात काही ठिकाणी रिमझिम, तर काही ठिकाणी जोरदार पाऊस झाला कायगाव, अमळनेर वस्ती (ता. गंगापूर) परिसरात बुधवारी (ता. १४) रात्री वादळी वाऱ्यासह धो धो आलेल्या अवकाळी पावसाने ऊसतोड कामगारांच्या पाचटाच्या कोप्या भिजून त्यांचे हाल केले. तर हरभरा, गहू, तूर आणि कापूस उत्पादक शेतकरी हवालदिल झाले आहेत.

बुधवारी (ता. १४) अनेक भागांत दिवसभर ढगाळ वातावरण होते. सायंकाळी पावसाचे ढग दाटून आले. रात्री सव्वादहाच्या सुमारास वादळी वाऱ्यासह अचानक धो धो पाऊस बरसला. गोदावरी नदी काठच्या अमळनेर वस्ती, जुने कायगाव, लखमापूर आदी गंगथंडी भागात अर्धा तासाच्या वर पावसाच्या सरी कोसळल्या. या पावसाने सर्वत्र शेतशिवार ओलेचिंब झाले होते. अचानक आलेल्या पावसाने ऊसतोड कामगारांचे मोठे हाल केले. दिवसभर ऊसतोड करून पाचटाच्या कोप्यात झोपी गेलेले ऊसतोड कामगार व त्यांची लहान चिमुकली मुले अचानक आलेल्या पावसात भिजली. कोप्यावर ताडपत्री पाचट टाकण्यासाठी अनेकांची रात्रीच्या अंधारात धावपळ उडाली. तूर सोंगणीला आलेले शेतशिवार ओलेचिंब झाले. अनेक ठिकाणी वेचणीस आलेला कापूस भिजला. हरभरा, ज्वारी पिकांसाठी पाऊस पोषक असला, तरी कांदा, गहू या रब्बी पिकांसाठी आणि भाजीपाला पिकांसाठी नुकसानकारक आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Garlic Rate : लसणाची आवक घटल्याने दर तेजीतच

Forest Fire : वणवे नियंत्रणासाठी जनजागृती करण्याची गरज

Sugarcane Labor Migration : निवडणूक संपताच ऊसतोड मजुरांचे स्थलांतर

Sugarcane FRP : मंडलिक साखर कारखाना इतरांच्या बरोबरीने दर देणार

Milk Rate : देशातील दूध उत्पादनात ४ टक्के वाढ; केंद्रीय मंत्र्यांची माहिती

SCROLL FOR NEXT