Crop Damage
Crop Damage Agrowon
ताज्या बातम्या

Akola Unseasonal Rain : अवकाळी पावसाचा तिसऱ्या दिवशीही धुमाकूळ

Team Agrowon

Akola News जिल्ह्यासह लगतच्या वाशीम, बुलडाणा जिल्ह्यात अवकाळी पावसाने (Unseasonal Rain) गेल्या तीन दिवसांपासून धुमाकूळ घातला आहे. प्रामुख्याने अकोला जिल्ह्यात पावसाने मोठे नुकसान (Crop Damage) केले आहे.

रविवारी (ता. ९) रात्री उशिरापर्यंत आलेल्या पावसाने गहू, फळबागांचे मोठे नुकसान केल्याचे समोर आले आहे. आधीच शुक्रवार (ता. ७) पर्यंत पाच हजार हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले होते. त्यानंतर रविवारी यात भर पडली आहे.

रविवारी पातूर तालुक्यात पुन्हा गारपीट झाली. या तालुक्यात वादळीवाऱ्यासह अवकाळी पाऊस तसेच गारपीट झाल्याने गव्हासह फळपिकांना मोठा फटका बसला.

अनेक ठिकाणची कडुलिंबाची झाडे उन्मळून पडली. कांदा, संत्रा या पिकांचे नुकसान झाले. सोसाट्याच्या वाऱ्यामुळे आणि गारपिटीने झाडावरील आंबे तुटून पडले. कांदा पीक जमीनदोस्त झाले. अकोला तालुक्यात वादळवाऱ्यासह जोरदार पाऊस झाला.

अकोट व तेल्हारा तालुक्यात पिकांना मोठा फटका बसला. पातूर, मूर्तिजापूर आणि बार्शीटाकळी तालुक्यांतील पिकांची नासाडी केल्यानंतर पुन्हा एकदा पावसाने झोडपले.

बुलडाणा जिल्ह्यात नुकसान

रविवारी (ता. ९) बुलडाणा जिल्ह्यात अनेक ठिकाणी वादळी वाऱ्यासह पाऊस झाला. काही ठिकाणी गारपीटही झाली. खामगाव, शेगाव तालुक्यांतील काही गावे व निमगावसह परिसरात या वादळाने पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान केले. शेगाव- वरवट बकाल मार्गावर झाडे पडल्याने वाहतूक ठप्प झाली होती.

मध्यरात्रीपर्यंत वाहनांच्या रांगा लागलेल्या होत्या. खामगाव तालुक्यातील चितोडा, अंबिकापूर येथे अर्धा तास विजांच्या कडकडाटासह गारपीट झाल्याचे समजते. बोथाकाजी, आंबेटाकळी, बोरी अडगाव, कंचनपूर उमरा भिसे, अटाळी, हिंगणा कारेगा, पळशी खुर्द. काळेगाव, ढोरपगाव व मालेगाव बाजार अशा गावांमध्ये नुकसान झाले.

चिखली तालुक्यातील अमडापूर परिसरात रात्री १० वाजेच्या सुमारास वादळी वारा व विजांच्या कडकडाटासह पाऊस झाला. यामुळे भुईमूग, कांदा, ज्वारी, टोळ कांद्याचे नुकसान झाले.

जिल्ह्यात निमगाव येथे रविवारी (ता.९) अवकाळी पाऊस व गारपिटीमुळे नुकसान झाले. या परिसरातील दादगाव, रोटी, भोटा, हिंगणा भोटा, इसापूर, हिंगणा इसापूर, येरळी शिवारात गहू, ज्वारी, मका, कांदा पिकांचे प्रचंड नुकसान आहे. जिल्ह्यात इतरही ठिकाणी अवकाळी पाऊस झाला.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Leopard Attack : राधानगरीत बिबट्याचा हल्ल्यात गाय ठार, धनगरवाड्यात भितीचे वातावरण

Pulses Market : महाडला देशी कडधान्ये तेजीत

Water Issue : योजना सुरू, पण लाभ क्षेत्रातील तलाव कोरडे

Agrowon Podcast : मक्याला काय भाव मिळतोय? कापूस, सोयाबीन, गहू, टोमॅटो यांचे दर काय आहेत?

Sugar Quota : मे महिन्यात साखरेचा कोटा वाढला, घाऊक बाजारात मंदीची लाट

SCROLL FOR NEXT