Crop Damage : सातारा जिल्ह्यात वादळी पावसाने नुकसान

माण तालुक्यातील दहीवडी, गोंदवले परिसरात पावसामुळे फळबागांना चांगलाच फटका बसला.
Crop Damage
Crop Damage Agrowon
Published on
Updated on

Satara News : जिल्ह्यात शुक्रवारी दुपारी चारच्या सुमारास झालेल्या वादळी पावसाने (Satara Rain Update) मोठी दैना केली. पावसामुळे डांभेवाडी परिसरातील द्राक्ष बागांचे लाखो रुपयांचे नुकसान (Crop Damage Satara) झाले, सातारा, वाई, कोरेगाव, खटाव, पाटण, फलटण तालुक्यांत वादळी पावसाने पिकांचे नुकसान झाले.

माण तालुक्यातील दहीवडी, गोंदवले परिसरात पावसामुळे फळबागांना चांगलाच फटका बसला. गोंदवले बुद्रुकमधील पांडुरंग घोरपडे यांची गाय विजेच्या आवाजाने जागेवरच मृत झाली.

Crop Damage
Crop Damage In Marathwada : वादळी वाऱ्यासह हलक्या पावसाने बाजरी आडवी

वाई तालुक्यातील कवठे, भुईंज परिसरात काढणीच्या अंतिम टप्प्यात असलेल्या ज्वारी, गहू, हरभरा, कांदा, भाजीपाल्याचे मोठे नुकसान झाले. खटाव तालुक्यातील डांभेवाडी, शिंगाडवाडी येथे सुमारे साडे दहा एकर क्षेत्रांतील द्राक्षबागेचे सव्वा कोटी रुपयांचे नुकसान झाले.

डांभेवाडी येथील विक्रम दादासाहेब बागल पाटील यांनी दोन एकर क्षेत्रात निर्यातक्षम द्राक्षाचे नुकसान झाले. यामध्ये तब्बल ३५ ते ४० लाख रुपयांचे नुकसान झाल्याचे बागल यांनी सांगितले.

Crop Damage
Crop Damage : पुणे जिल्ह्यात पावसामुळे पिकांचे नुकसान

तसेच गुलाबराव बागल यांची एक एकर क्षेत्रातील निर्यातक्षम द्राक्ष बागही जमीनदोस्त होऊन त्यांचे ३६ लाखांचे नुकसान झाले. मधुकर कृष्णा बागल यांच्या पाऊण एकर बागेचे १७ लाखांचे नुकसान झाले.

केशव बागल यांच्या दोन एकर बागेचे ३० लाख रुपयांचे नुकसान झाले. किरण कुलकर्णी यांच्या सव्वा एकर बागेचे १५ लाख रुपयांचे नुकसान झाले. हणमंत गुरव यांच्या एक एकर बागेचे ५ लाख रुपयांचे नुकसान झाले.

कृष्णात बागल यांच्या अर्धा एकर द्राक्ष बागेचे २ लाख रुपयांचे नुकसान झाले. विपूल बागल यांच्या एक एकर बागेचे २ लाख रुपयांचे नुकसान झाले. वैभव बागल यांच्या दीड एकर बागेचे दीड लाख रुपयांचे नुकसान झाले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com