
Kolhapur News : वादळी पावसाने नुकसान झालेल्या हातकणंगले तालुक्यातील १ हजार ८१ शेतकऱ्यांना शासनाकडून ५७ लाख ५९ हजार ५३६ रुपयांची नुकसानभरपाई (Crop Damage Compensation) मंजूर झाली आहे. संबंधित शेतकऱ्यांच्या खात्यावर भरपाईची रक्कम जमा होण्यास सुरुवात झाली आहे.
ही भरपाई मिळावी म्हणून शासनाकडे पाठपुरावा केला होता, अशी माहिती आमदार राजूबाबा आवळे (MLA Rajubaba Awle) यांनी दिली.
परतीच्या वादळी पावसाने ऑक्टोबर २०२२ मध्ये तालुक्यातील पिकांना चांगलाच तडाखा दिला होता. त्यामुळे खरीप हंगामातील सोयाबीन, भुईमूग, भाजीपाला, फळपिके तसेच इतर पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते.
नुकसानीची शेतकरी तसेच कृषी, महसूल, ग्रामविकास विभागातील अधिकाऱ्यांना घेऊन तालुक्यातील अनेक गावांत थेट शेतावर जाऊन पाहणी केली होती.
त्यावेळी अधिकाऱ्यांना बांधावर जाऊन तातडीने अचूक पंचनामे करा व त्याचा अहवाल शासनाकडे पाठवा, अशा सूचना दिल्या होत्या.
त्यानुसार तत्काळ अहवाल सादर केला. शासनाकडे नुकसान भरपाई मिळावी यासाठी पाठपुरावा केला.
तालुक्यातील ३७८ हेक्टर क्षेत्रामधील १ हजार ८१ शेतकऱ्यांना ५७ लाख ५९ हजार ५३६ रुपयांची नुकसान भरपाई मंजूर झाली आहे. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या खात्यावर रक्कम जमा होण्यास सुरुवात झाली आहे.
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.