Onion Rate  Agrowon
ताज्या बातम्या

Onion Rate : केंद्रीय मंत्र्यांनाही ‘नाफेड’च्या कांदा खरेदीची सखोल माहिती मिळेना

भाव स्थिरीकरण योजनेअंतर्गत जिल्ह्यात २ लाख ३८ हजार टन कांदा खरेदी झाली. मात्र असे असताना यासंबंधी कामकाजाची सविस्तर माहिती केंद्रीय मंत्र्यांनाही मिळत नसल्याची बाब पुन्हा एकदा उघड झाली आहे.

टीम ॲग्रोवन

नाशिक : भाव स्थिरीकरण योजनेअंतर्गत (Price Stability Scheme) जिल्ह्यात २ लाख ३८ हजार टन कांदा खरेदी (Onion Procurement) झाली. मात्र असे असताना यासंबंधी कामकाजाची सविस्तर माहिती केंद्रीय मंत्र्यांनाही मिळत नसल्याची बाब पुन्हा एकदा उघड झाली आहे. नाफेडची (NAFED) (भारतीय राष्ट्रीय कृषी सहकारी विपणन महासंघ) यंत्रणा कांदा खरेदी, सध्याची उपलब्धता व वितरण या बाबत गोपनीयता ठेवत असल्याचे समोर आले आहे.

केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांनी बुधवारी (ता. १६) दुपारी ३ वाजता जिल्हाधिकारी कार्यालयात नाफेडच्या कांदा खरेदी अनुषंगाने आढावा बैठक घेतली. या वेळी जिल्हाधिकारी गंगाथरन डी., निफाड उपविभागीय अधिकारी डॉ. अर्चना पठारे, पिंपळगाव बसवंत येथील विभागीय कार्यालयाचे ‘नाफेड’चे सहायक व्यवस्थापक शैलेंद्र कुमार आदी उपस्थित होते. नाफेडच्या कांदा खरेदी लक्ष्यांकापैकी किती कांद्याची सध्या उपलब्धता आहे. खरेदीपैकी किती कांदा खराब झाला. या बाबत सविस्तर माहिती वारंवार विचारणा करूनही प्राप्त झालेली नाही.

यापूर्वी सुद्धा पालकमंत्री दादा भुसे, केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांनाही शैलेंद्र कुमार यांनी माहिती दिली नसल्याचे समजते. या पार्श्‍वभूमीवर जिल्हाधिकारी गंगाथरन डी. यांच्या अध्यक्षतेखाली नियुक्त केलेल्या चौकशी समितीलाही कांदा खरेदी-विक्रीची कागदपत्रे देण्यास नकार देण्यात आल्याचे समोर आले आहे. त्यामुळे या खरेदी प्रक्रियेत नेमका गोंधळ काय, असा संशय उपस्थित झाला आहे.

‘नाफेड’च्या माध्यमातून कांदा खरेदीदरम्यान भाव पडल्याने नुकसान झाल्याबाबत लोकप्रतिनिधींच्या तक्रारीनंतर चौकशी करून त्याचा अहवाल जिल्हा प्रशासनाने पीएमओ पोर्टलवर अपलोड करावा, असे आदेश भुसे यांनी जिल्हा नियोजनाच्या बैठकीत दिले होते. जिल्हाधिकारी कार्यालयाकडून चौकशी सुरू करण्यात आली. मात्र यासंबंधीची माहिती व कागदपत्रे देण्यास शैलेंद्र कुमार यांनी सहकार्य केलेले नाही. वरिष्ठ कार्यालयाला विचारून यासंबंधीची माहिती दिली जाईल, असा सूर त्यांचा कायम राहिला आहे.

केंद्रीय मंत्र्यांनी या प्रकरणी घातले लक्ष

‘नाफेड’च्या खरेदीपश्चात साठवणुकीत किती कांदा खराब झाला या बाबत स्पष्ट माहिती पुढे आलेली नाही. केवळ खरेदीबाबत माहिती दिली जाते. ज्यामध्ये जिल्ह्यात दोन लाख ३८ हजार टन कांदा खरेदी झाला आहे. पैकी ५० टक्के कांद्याचे वितरण झाले आहे. मात्र केंद्र शासनाचा निधी वापरून त्यात स्पष्टता नसल्याने डॉ. पवार यांनी कांदा खरेदीसंबंधीत तक्रारीची दखल घेऊन यात लक्ष घातले आहे. सद्यःस्थितीत त्वरित कांदा वितरण करा. ज्या राज्यात कांद्याची गरज आहे अशाच भागात कांदा पाठविण्याच्या सूचना त्यांनी दिल्या आहेत.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Sugarcane Payments Pending: ऊस बिले द्या, अन्यथा जलसमाधि

Farmer Loan Waiver : २०१७ आणि २०१९ च्या कर्जमाफीपासून वंचित राहिलेल्या शेतकऱ्यांसाठी निर्णय

Drinking Water Storage: तेरा प्रकल्पांतील साठा पिण्यासाठी आरक्षित

Tur Seeds Procurement: तेलंगणातील शेतकरी तूरीच्या बियाणे खरेदीसाठी करमाळ्यात

Agrowon Podcast: आल्याचा भाव टिकून; सोयाबीन टिकून, गहू आवक घटली, तर कापूस व कारले स्थिरावले

SCROLL FOR NEXT