Team Agrowon
सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या (Market Committee) आवारात गतसप्ताहात कांदा (Onion) दरात किंचित सुधारणा झाली. कांद्याला प्रतिक्विंटलला सर्वाधिक ४००० रुपये इतका दर मिळाल्याचे बाजार समितीच्या सूत्रांकडून सांगण्यात आले.
बाजार समितीच्या आवारात गतसप्ताहात कांद्याची आवक रोज १०० ते २०० गाड्यांपर्यंत राहिली.
कांद्याची सर्व आवक स्थानिक बार्शी, मोहोळ, पंढरपूर या भागासह सांगली आणि पुणे भागातून झाली.
गेल्या पंधरवड्यापासून कांद्याच्या आवकेत चढ-उतार होतो आहे. पण मागणी असल्याने कांद्याच्या दरात किंचित सुधारणा झाली आहे.
कांद्याला प्रतिक्विंटलला किमान १०० रुपये, सरासरी १५०० रुपये आणि सर्वाधिक ४००० रुपये असा दर मिळाला.