Akola News : डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ विकसित तंत्रज्ञानाचा अवलंब करून शाश्वत उत्पादनासाठी प्रयत्न करावा, असे आवाहन वरिष्ठ संशोधन शास्त्रज्ञ डॉ. आर. बी. घोराडे यांनी केले. .कृषी विद्यापीठातील कापूस संशोधन विभागाच्या वतीने मंगळवारी (ता. ७) जागतिक कापूस दिनाचा कार्यक्रम या वर्षी अलियाबाद येथील अजय पागृत यांच्या शेतात घेण्यात आला. या वेळी अध्यक्ष म्हणून ते बोलत होते..विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. शरद गडाख तसेच संशोधन संचालक डॉ. श्यामसुंदर माने यांच्या मार्गदर्शनात कापूस संशोधन विभागातील शास्त्रज्ञांनी शेतांना भेट देऊन कापूस पिकाची स्थिती, कीड व रोग व्यवस्थापन तसेच पीक नियोजनाबाबत सविस्तर मार्गदर्शन केले..PDKV Akola : इन्स्टिट्यूशनल फेलो पुरस्काराने ‘पंदेकृवि’चा झाला सन्मान.कृषी विद्यावेत्ता डॉ. संजय काकडे यांनी पावसाच्या उघडिपीनंतर कापूस पिकाची काळजी घेण्यासंबंधी तांत्रिक मार्गदर्शन केले. कोरडवाहू परिस्थितीत जास्त उत्पादनासाठी अतिघनता लागवड व कापूस पीक संरचना व्यवस्थापन तंत्रज्ञान या विषयावर शेतकऱ्यांना माहिती दिली. .PDKV Akola : शिवार फेरीमध्ये पीक वाण, तंत्रज्ञान जाणून घेण्यासाठी शेतकऱ्यांची गर्दी.कापूस कीटकशास्त्रज्ञ पी. पी. पाटील, यांनी गुलाबी बोंड अळीचे नियंत्रण व व्यवस्थापन या बाबत सविस्तर मार्गदर्शन केले. कापूस पैदासकार डॉ. नवीनचंद्र कायंदे यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधून त्यांच्या समस्यांची माहिती घेतली व विद्यापीठाचे नवीन विकसित कापूस वाण २०२२-१ आणि २०२२-२ यांची वैशिष्ट्ये सांगितली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. ओमप्रकाश राखोडे यांनी केले. तर श्रीकांत सरप यांनी आभार मानले..या कार्यक्रमाला विभागातील वरिष्ठ संशोधन सहायक सचिन इंगळे, कनिष्ठ संशोधन सहायक एन. जे. वानखडे उपस्थित होते. हा कार्यक्रमाला चाचोंडी गावातील प्रगतिशील शेतकरी जगन्नाथ मुरूमकार, अजय पागृत, गणेश पागृत, प्रमोद पागृत, उमेश पागृत आणि योगेश पागृत व इतर मोठ्या संख्येने उपस्थित होते. .ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.