Sangli News : सांगली जिल्ह्यात यंदा सप्टेंबर निम्मा महिना पावसाने उघडीप दिली होती. परंतु चौदा दिवस पाऊस झाल्याने २०२.७ मिलिमीटर म्हणजे १४६.२ टक्के इतक्या पावसाची नोंद झाली आहे. गतवर्षीच्या तुलनेत यंदा सप्टेंबर महिन्यात ४५ टक्क्यांनी अधिक पाऊस झाला असल्याचे कृषी विभागाने तयार केलेल्या अहवाल नमूद केले आहे..जिल्ह्यात यंदा मे महिन्यापासून सलग पाऊस सुरू आहे. त्यामुळे खरिपातील पेरणी लांबणीवर पडल्या होत्या. परंतु उघडीप मिळाल्याने खरिपातील पेरण्या पूर्ण झाल्या. ऑगस्ट महिन्यात चौदा दिवसांत १४१.५ मिलिमीटर म्हणजे १२७ टक्के इतका पाऊस झाला. तर सप्टेंबर २०२५ मध्ये १४६.२ इतक्या पावसाची नोंद झाली आहे..जिल्ह्यात सप्टेंबर २०२४ मध्ये १२ दिवस पाऊस झाला. या महिन्यात १४०.३ मिलिमीटर म्हणजे १०१ टक्के इतका पावसाची नोंद झाली होती. यंदा सप्टेंबर महिन्यात पहिल्या आठवड्यात पावसाने उघडीप दिली, तर दुसऱ्या आठवड्यात जिल्ह्यातील सर्व तालुक्यांत हलका व मध्यम स्वरूपाचा पाऊस झाला. .दरम्यान, २६ सप्टेंबर रोजी जिल्ह्यात मुसळधार पावसाने हजेरी लावली. जिल्ह्यातील ६८ मंडलांपैकी २२ मंडलांत अतिवृष्टी झाली. त्यामुळे या महिन्यात पावसाची टक्केवारी वाढली आहे. जिल्ह्यात सप्टेंबर २०२३ मध्ये ११२.६. सप्टेंबर २०२२ मध्ये १६४.३ तर सप्टेंबर २०२१ मध्ये ९१.८ मिलिमीटर इतक्या पावसाची नोंद झाली आहे. .Tamhini Rainfall: ताम्हिणीत भारतातील सर्वाधिक पावसाची नोंद.वास्तविक पाहता, गेल्या चार वर्षांपासून सप्टेंबरमध्ये पावसाचे प्रमाण वाढत असल्याचे कृषी विभागाने तयार केलेल्या अहवालात नोंद केलेल्या आकडेवारीवरून दिसून येत आहे. तासगाव, कवठेमहांकाळ, जत, आटपाडी आणि खानापूर या दुष्काळी तालुक्यांत गतवर्षीच्या तुलनेत यंदाच्या सप्टेंबर महिन्यात सर्वाधिक पाऊस झाला आहे..Nanded Heavy Rainfall: नांदेडला पुन्हा जोरदार पाऊस.आटपाडी तालुक्यात २९९ मिलिमीटर इतक्या पावसाची नोंद झाली आहे. या पावसाने खरिपासह फळ पिकांचे नुकसान झाले आहे. परंतु या दुष्काळी तालुक्यातील पाणीसाठा वाढला आहे..तुलनात्मक पाऊस दृष्टिक्षेपतालुका सप्टेंबर २०२५ सप्टेंबर २०२४मिरज १७७.५ १४१.६जत २३८.९ १३२.१खानापूर २६१.६ १३९.४वाळवा १४१.८ १११.३तासगाव २५८.६ १८५.१शिराळा १६६.६ १६३.८आटपाडी २९९.९ ११७.६कवठेमहांकाळ २८२.४ १५८.४पलूस १४३.१ १४९.९कडेगाव १६४.२ १२१.९एकूण २०२.७ १४०.३ .ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.