Millet  Agrowon
ताज्या बातम्या

Millet Crop : पौष्टिक सुरक्षेचे महत्त्व समजून घ्या

Latest Agriculture News : संयुक्त राष्ट्र संघटनेने व भारत सरकारने २०२३ वर्ष आंतरराष्ट्रीय पौष्टिक भरडधान्य वर्ष म्हणून साजरे करण्याचे ठरविले आहे.

Team Agrowon

Chhatrpati Sambhajinagar News : संयुक्त राष्ट्र संघटनेने व भारत सरकारने २०२३ वर्ष आंतरराष्ट्रीय पौष्टिक भरडधान्य वर्ष म्हणून साजरे करण्याचे ठरविले आहे. त्या अनुषंगाने पीक पद्धतीत व आहारात बाजरी पिकाचा समावेश करून बाजरी पिकाविषयी शेतकऱ्यांना महत्त्व पटवून देण्याच्या दृष्टीने व मूल्यवर्धनाच्या दृष्टीने विद्यापीठाच्या वतीने प्रयत्न सुरू आहेत.

शेतकऱ्यांनी अन्नसुरक्षा बरोबरच पौष्टिक सुरक्षांचे महत्त्व समजून घेऊन या पिकांचा पीक पद्धतीत व आहरात समावेश करावा, असे मत छत्रपती संभाजीनगर येथील राष्ट्रीय कृषी संशोधन प्रकल्पाचे सहयोगी संचालक संशोधन डॉ. सूर्यकांत पवार यांनी व्यक्त केले.

वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ परभणीअंतर्गत राष्ट्रीय कृषी संशोधन प्रकल्प छत्रपती संभाजीनगर येथील अखिल भारतीय समन्वय प्रकल्पमार्फत संशोधित जैव संपृक्त बाजरी संकरित वाण एएचबी-१२०० यामध्ये लोहाचे प्रमाण ८७ पीपीएम व जस्तचे प्रमाण ३७ पीपीएम आहे.

त्याच प्रमाणे एएचबी- १२६९ वाणमध्ये लोह ९१ पीपीएम व जस्त ४३ पीपीएम आहे. या वाणाचे प्रत्याक्षिके वैजापूर तालुक्यातील खंडाळा, बाबूळतेल, नायगाव्हण ता. वैजापूर येथे राष्ट्रीय कृषी संशोधन प्रकल्प छत्रपती संभाजीनगर व कृषी विभाग ‘आत्मा’ यांच्यामार्फत १०० शेतकरी यांना एचबी १२०० संकरित वाणचे बियाणे देण्यात आले होते.

बाजरा शेती दिनाचे औचित्य साधून शेतकऱ्यांना या वाणाचे गुणधर्म, लागवड व पीक पद्धती व आहारातील महत्त्व या विषयावर चर्चा केली. या वेळी शेतकरी यांनी या वाण विषयी मनोगत व्यक्त केले.

आत्मा प्रकल्प उपसंचालक अनिल कुलकर्णी, तालुका कृषी अधिकारी वेंकट ठक्के, सहयोगी प्राध्यापक वनस्पती रोग शास्त्रज्ञ, डॉ. दिलीप हिंगोले, सहयोगी प्राध्यापक कृषी विद्या डॉ. चंद्रकांत पाटील, सहायक प्राध्यापक डॉ. आशिष बागडे, बाजरा संशोधन केंद्राचे एन. एन. कुंदे, कृषी पर्यवेक्षक विशाल दागोडे, कृषी सहायक श्रीमती जेजुरकर, कृषी पर्यवेक्षक दत्ता पुंड, तालुका तंत्रज्ञान व्यवस्थापक आत्मा प्रसाद शिंदे व शेतकरी अशोक जगन्नाथ पवार, सुनीता अशोक पवार, सुभाष सूर्यवंशी, पांडुरंग सूर्यवंशी, नामदेव सूर्यवंशी, छगन पवार, चंद्रकलाबाई पवार, ज्योती सूर्यवंशी, संजय बागूल, सुदाम पवार, रवींद्र पवार, सुनील पवार, परमेश शेख, राजेंद्र जानराव, भगवान सूर्यवंशी, संतोष गाडेकर, लक्ष्मण सूर्यवंशी उपस्थित होते.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Anti Corruption: विहिरीच्या नोंदीसाठी लाच मागणारा लिपिक ‘लाचलुचपत’च्या जाळ्यात 

Farmer Compensation: भरपाईतही नव्या दरामुळे फटका

Leopard In Solapur: बिबट्यांची संख्या पन्नास की शंभर?

White Grub Infestation: हुमणी नियंत्रणासाठी कृषी विभागाचे वरातीमागून घोडे

Onion Farmers: कांदा उत्पादक शेतकऱ्यांना न्याय देण्याची मागणी

SCROLL FOR NEXT