Millet Agrowon
ताज्या बातम्या

Bajari In Diet : आहारात बाजरी खाण्याचे महत्त्व समजून घ्या

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्षाचे निमित्त साधत राष्ट्रीय कृषी संशोधन प्रकल्पनिर्मित बाजरी वान एएचबी १२०० चे उन्हाळी हंगामात लाखेगाव येथे २५ पीक प्रात्यक्षिक या गावात दिलेली होती.

Team Agrowon

छत्रपती संभाजीनगर : आहारात बाजरी खाण्याचे (Millet) महत्त्व समजून घेण्याचा सल्ला छत्रपती संभाजीनगर येथील राष्ट्रीय कृषी संशोधन प्रकल्पाचे शास्त्रज्ञ डॉ. सी. बी. पाटील यांनी दिला.

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्षाचे (Millet Year) निमित्त साधत राष्ट्रीय कृषी संशोधन प्रकल्पनिर्मित बाजरी वान एएचबी १२०० चे उन्हाळी हंगामात लाखेगाव येथे २५ पीक प्रात्यक्षिक या गावात दिलेली होती.

यावेळी लाभार्थी शेतकऱ्यांना डॉ. पाटील मार्गदर्शन करीत होते. डॉ. पाटील म्हणाले, की आजच्या काळात माणसाच्या दैनंदिन आहारात गहू या अन्न पिकाचा वापर होत आहे. परंतु या पिकापेक्षाही बाजरी पिकाचे आहारात मोठे महत्त्व आहे.

त्यातही या वाणात लोह आणि जस्त या अन्नद्रव्ये जास्त प्रमाणात आहे. त्यामुळे या वाणाचे आहारात वापर करावा. डॉ दिलीप हिंगोले म्हणाले, की शेतकऱ्यांनी नेहमी एकच पीक सारखे सारखे न घेता पीक फेरपालट करावी.

यात बाजरी, ज्वारी या पिकाची निवड करावी. या पिकास उत्पादन खर्च इतर पिकाच्या तुलनेत फार कमी येतो. ठोंबरे म्हणाले, की या वाणाचे उत्पादन घरी आल्यावर १० किलोचे पॅक करून विक्री करावी. ज्यामुळे अधिकचा दर मिळेल.

या गटचर्चेनंतर शेतात ए एच बी १२०० या वाणाची पाहणी करण्यात आली. यावेळी डॉ. दिलीप हिंगोले, विभागीय रामेश्वर ठोंबरे, लक्ष्मण रहाटवाडे, प्रगतशील उपस्थित होते.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Ahilyanagar Crop Damage : अहिल्यानगर जिल्ह्यात पिकांचे पंचनामे सुरू

Maharashtra Agriculture : संकटातून बाहेर काढण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणार; महसूलमंत्री बावनकुळे

Sugarcane Price Dispute : ऊसदराचा निर्णय होईपर्यंत कारखाने बंद ठेवा;‘स्वाभिमानी’चा इशारा

Banana Crop Insurance : केळी विमाधारकांच्या परताव्याची मागणी

Drought Relief : दुष्काळसदृश स्थितीत पाणी, चारा, रोजगार हमीच्या उपाययोजनांना गती द्या; जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर

SCROLL FOR NEXT