Millet Year 2023 : वाशीम येथे भरडधान्य पीक उत्पादनाच्या संधी या विषयावर प्रशिक्षण कार्यक्रम

भारत सरकार २०२३ हे वर्ष बाजरीचे आंतरराष्ट्रीय वर्ष म्हणून साजरे करीत आहे.
Millet Year 2023
Millet Year 2023Agrowon

Washim News : श्रीअन्न जागतिक परिषदेनिमित्त नैसर्गिक शेती अंतर्गत भरडधान्य पीक उत्पादनाच्या संधी व दिशा या विषयावर जिल्हास्तरीय प्रशिक्षण व जनजागृती कार्यशाळा कृषी विज्ञान केंद्राच्या पुढाकाराने घेण्यात आली.

भारत सरकार २०२३ हे वर्ष बाजरीचे आंतरराष्ट्रीय वर्ष म्हणून साजरे करीत आहे. पोषण सुरक्षा, हवामानातील लवचिकता सुनिश्चित करण्यासाठी तसेच त्यांची लागवड, मूल्यवर्धन आणि उपभोग यांना प्रोत्साहन देण्यासाठी कृषी मंत्रालयाद्वारे या उत्सवाचा पहिला जागतिक कार्यक्रम आयोजित केला जात आहे. या अनुषंगाने केव्हीकेनेही आयोजन केले होते.

Millet Year 2023
Millet Crop : स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदाच भरडधान्यउत्पादक शेतकऱ्यांच्या गरजांकडे लक्ष

कार्यक्रमाला कृषी विज्ञान केंद्राचे प्रमुख व वरिष्ठ शास्त्रज्ञ डॉ. आर. एल. काळे, विस्तार शिक्षण शाखेचे डॉ. एस. के. देशमुख, कृषी विद्या शाखेचे टी. एस. देशमुख, गृह विज्ञान शाखेच्या शुभांगी वाटाणे व पीएमएफएमईचे गोपाल मुठाळ उपस्थित होते.

प्रास्ताविकात डॉ. देशमुख यांनी भरडधान्याचे महत्त्व सांगून दैनंदिन आहारामध्ये ज्वारी, बाजरी, राजगिरा यांचा वापर वाढवावा याकरिता कृषी विज्ञान केंद्र जनजागृती करीत असल्याचे सांगितले.

डॉ. काळे यांनी अल्पभूधारक शेतकऱ्यांकरीता भरडधान्य व वातावरण अनुकूल व पोषक असल्याचे स्पष्ट केले.

शेती जल जमीन व तापमानात बदलास अनुकूल वायु प्रदूषण कमी करता येवू शकते आणि कमी पाणी लागणारे तृणधान्ये, भरडधान्ये पिके ज्वारीसह बाजरी, वरई, राळा, भगर, राजगिरा इत्यादी कमी खर्चात उत्पादित होऊ शकतात.

Millet Year 2023
Millet Crop : स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदाच भरडधान्यउत्पादक शेतकऱ्यांच्या गरजांकडे लक्ष

नैसर्गिक निविष्ठाचा वापर करून आरोग्यपूर्ण आहार व धान्य निर्मिती ही भविष्याची गरज आहे. कृषी विद्या शाखेचे टी. एस. देशमुख यांनी भरडधान्य पिकांच्या माध्यमातून वातावरणीय जलवायु बदलामुळे शाश्वत शेती उत्पन्नासाठी तसेच जमिनीचे आरोग्य व मानवी आरोग्य बदल करणे शक्य आहे.

शुभांगी वाटाणे यांनी पौष्टिक तृणधान्याचे आहारातील महत्त्व पटवून देत सर्व तृण धान्यात बाजरी ही जास्त ऊर्जा देणारी आहे सांगितले.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
document.addEventListener("qt-page-data", (e) => { console.log(e.detail); })
Agrowon
agrowon.esakal.com