Summer Crop Agrowon
ताज्या बातम्या

Summer Sowing : उन्हाळी हंगामात ज्वारी, मूग लागवडीकडे कल वाढला

Unhali Pik Lagwad : मागील दोन ते तीन वर्षांपासून उन्हाळी हंगामात ज्वारी तसेच मुगाची लागवड वाढत आहे.

Team Agrowon

Akola Summer Crop Update : मागील दोन ते तीन वर्षांपासून उन्हाळी हंगामात ज्वारी तसेच मुगाची लागवड वाढत आहे. यंदा वऱ्हाडातील तीनही जिल्ह्यात ज्वारीची सुमारे दोन हजार हेक्टर, तर मुगाची हजार हेक्टरपेक्षा अधिक क्षेत्रावर लागवड झालेली आहे.

मुळात ही दोन्ही पिके खरिपातील असून, दरवर्षी अतिपावसाने हंगामात नुकसान होत असल्याने शेतकरी उन्हाळी लागवडीकडे वळत असून, बऱ्यापैकी उत्पादन मिळू लागले आहे. यंदा या दोन्ही पिकांनी उन्हाळी हंगामात साथ दिली आहे.

मागील तीन ते चार वर्षांत खरीप हंगामात सुरुवातीला अतिपाऊस होतो. शिवाय पीक काढणीच्या काळातही अतिपाऊस होत असल्याने ज्वारी, मूग, उडीद ही पिके बेभरवशाची झालेली आहेत. अकोला जिल्ह्यात तर दोन हंगामांत मूग, उडदाचे संपूर्ण पीक हातातून गेलेले आहे. त्यामुळे शेतकरी आता उन्हाळी हंगामात ज्वारी, तसेच मुगाची लागवड करण्याकडे झुकत आहेत.

या भागात उष्णतामान जास्त असूनही सिंचनाची सोय असलेले शेतकरी लागवड करीत आहेत. ज्वारीसारख्या पिकामुळे शेतकऱ्यांना जनावरांसाठी चाराही उपलब्ध होत आहे. ज्वारीचे उत्पादन १२ पासून २० क्विंटल दरम्यान येत आहे.

तर मुगाचे उत्पादन एकरी २ ते ४ क्विंटलपर्यंत आहे. खरीपापेक्षा हे उत्पादन कमी असले तरी खरिपात होणारे नुकसान लक्षात घेता उन्हाळ्यात फायदेशीर ठरत असल्याचे शेतकरी सांगत आहेत. बदलती पीकपद्धती पाहता कृषी विद्यापीठांनी यादृष्टीने संशोधन करीत वाण देण्याची मागणीही होऊ लागली आहे.

उन्हाळी हंगामासमोरील आव्हाने -

- ज्वारी, मुगाचे दाणे खरिपाच्या तुलनेने बारीक तयार होतात

- वेळेवर सिंचन न झाल्यास उत्पादनात घटीची शक्यता

- सतत अति उष्णतापमान राहिल्यास अडचणी

फायदे

- उत्पादनाची शाश्‍वतता

ज्वारी पिकामुळे जनावरांसाठी चाऱ्याचीही उपलब्धता

उन्हाळी ज्वारीची लागवड ----

बुलडाणा ८६० हेक्टर

अकोला ४२८

वाशीम ५४०

उन्हाळी मूग लागवड

बुलडाणा ४८४

अकोला ३२६

वाशीम २५८

खरीप हंगामात गेल्या काही वर्षांत सतत पाऊस येत असल्याने ज्वारी, मूग, उडदाचे नुकसान होत आहे. त्यामुळे काही शेतकरी उन्हाळी लागवड करीत आहेत. उन्हाळ्यात मुगाचे सहा ते सात क्विंटलपर्यंत हेक्टरी उत्पादन येत आहे. कृषी विद्यापीठाच्या प्रक्षेत्रावरही यंदा लागवड केलेली आहे. एका झाडावर सरासरी ४० ते ५० पर्यंत शेंगा लागलेल्या आहेत.
- डॉ. अर्चना थोरात, शास्त्रज्ञ, डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Local Body Election : ‘झेडपी’, पंचायत समित्यांचा बिगुल

Fertilizer Shortage : युरिया, डीएपीचा तुटवडा, लिंकिंगने शेतकरी त्रस्त

Ginger Research Center: आले संशोधन केंद्राचा पेच; कृषिमंत्र्यांच विधानपरिषदेत बैठकीचं आश्वासन 

Silk Market : बीड रेशीम कोष बाजारात शेतकऱ्यांचे शोषण

Turmeric Market : नांदेडला हळदीचे चुकारे थकल्याने लिलाव पाडले बंद

SCROLL FOR NEXT