Crop Damage Agrowon
ताज्या बातम्या

Crop Damage : गव्यांच्या कळपांकडून आजऱ्यात पीक नुकसान

सुगीच्या हंगामात आजरा तालुक्यात हत्तीबरोबरच गव्यांच्या कळपांचा उपद्रव सुरू झाला आहे.

Team Agrowon

आजरा, जि. कोल्हापूर ः सुगीच्या हंगामात आजरा तालुक्यात हत्तीबरोबरच गव्यांच्या कळपांचा उपद्रव सुरू झाला आहे. हातातोंडाशी आलेले पीक (Crop) वन्यप्राणी फस्त करीत आहेत. त्यामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे. मुरुडे (ता. आजरा) येथील अलका पांडुरंग पाटील यांच्या शेतातील नागली व भात पिकाचे गव्यांच्या कळपाने मोठ्या प्रमाणात नुकसान केले. सुमारे पावणे दोन एकरांतील पीक तुडवून नुकसान केले.

मुरुडे गावानजीक पाटील यांचे शेत आहे. त्यांनी यंदा भात व नागली ही पिके घेतली आहेत. पावसामुळे भात कापणी व नागली शेंडलणीचे काम लांबले असताना गव्यांनी पाटील यांच्या शेतातील हातातोंडाशी आलेले भात व नागलीचे पीक तुडवून नुकसान केले.

यामुळे पाटील यांचे सुमारे लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. गव्यांचा कळप मुरुडे जंगलानजीक राहत आहे. रात्रीच्या वेळी तो पिकात उतरून नुकसान करीत आहे. मागील काही दिवसांत गव्यांचा उपद्रव सुरू आहे. वन विभागाने तातडीने गव्यांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी शेतकरी करीत आहेत.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Khandesh Fodder Crisis: खानदेशात यंदा चारापिके मुबलक

Mulberry Farming: अकोल्यात तुती लागवडीसाठी ६०० एकरांचे लक्ष्य निर्धारित

Mango Export: लंडनला समुद्रमार्गे आंबा पाठविण्याची तयारी

Indian Agriculture: कागदावरील करार, कुसातील हिशेब

Interview with Dada Lad: दादा लाड तंत्रज्ञानाचा देशभर प्रसार व्हावा

SCROLL FOR NEXT