PDCC Bank Pune Agrowon
ताज्या बातम्या

PDCC Bank Pune : ‘पीडीसीसी’ बँकेला ६८ कोटींचा नफा

पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या (पीडीसीसी) गेल्या आर्थिक वर्षात (सन २०२१-२२) एकूण ठेवीत, ढोबळ नफ्यात आणि निव्वळ नफ्यात विक्रमी वाढ झाली आहे.

टीम ॲग्रोवन

पुणे : पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या (पीडीसीसी) (PDCC) गेल्या आर्थिक वर्षात (सन २०२१-२२) (Economic Year 2021-2022) एकूण ठेवीत, ढोबळ नफ्यात (Profit) आणि निव्वळ नफ्यात विक्रमी वाढ झाली आहे. या आर्थिक वर्षात ठेवींमध्ये ५९ कोटी ६१ लाख रुपयांची वाढ झाली असून,

यामुळे एकूण ठेवी सुमारे अकरा हजार ३८९कोटी ६० लाख रुपयांपर्यंत पोहोचल्या आहेत. या वर्षात जिल्हा बँकेला तब्बल ३४९ कोटी ३८ लाख रुपयांचा ढोबळ, तर ६८ कोटी ६८ लाख रुपयांचा निव्वळ नफा झाला आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली.

ठेवी वाढल्यामुळे जिल्हा बँकेला आता कर्ज वितरणाच्या रकमेत वाढ करणे सोपे होणार आहे. शिवाय याचा फायदा हा शेतकरी आणि अन्य सभासदांना होऊ शकणार आहे. देशातील सर्वोत्कृष्ट जिल्हा बँक म्हणून पुणे जिल्हा बँकेने स्वतःची ओळख आहे.

त्यातच आता देशातील सर्वाधिक ठेवी असलेली बँक म्हणूनही जिल्हा बँकेने नवी ओळख निर्माण केली आहे. याआधीचे आर्थिक वर्ष (२०२०-२१) हे कोरोना संसर्गाच्या संकटामुळे मोठे अडथळ्याचे ठरले होते. मात्र या संकटाच्या काळातसुद्धा ठेवींमध्ये

वाढ करण्यात ही बँक यशस्वी ठरली होती.

बँकेची ३१ मार्च २०२२ रोजी बँकेची गुंतवणूक रुपये ७,१९७ कोटी ८९ लाख रुपये एवढी आहे. तर ३१ मार्च २०२२ रोजीपर्यंत ७ हजार ५६६ कोटी ३२ लाख रुपयांचे कर्ज वितरित केले आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Jackfruit Farming : कोकणात प्रक्रियेतून फणसाला मिळतेय नवी झळाळी

AI In Sugar cane: ऊस लागवडीत ‘एआय’ तंत्र वापरणार

Local Self Government : स्थानिक स्वराज्य संस्थांचे बळकटीकरण

Warehouse Receipt: पूर्व युरोप, मध्य आशिया खंडातील गोदाम पावती वित्तपुरवठा

Agriculture Development: दिशा कोरडवाहू शेती विकासाची!

SCROLL FOR NEXT