Kolhapur Bank : कोल्हापूर जिल्हा बँकेला उच्चांकी १८१ कोटींचा नफा : हसन मुश्रीफ

एनपीए संकल्पना अस्तित्वात आल्यापासून शून्य टक्के नेट एनपीए व बँकेच्या स्थापनेपासून पहिल्यांदाच १८१ कोटींचा ढोबळ नफा या यशस्वी टप्प्यावर बैंक पोहोचली आहे.
kolhapur bank
kolhapur bankAgrowon

कोल्हापूर : कोरोनासारख्या महासंकटावर मात करून बँकेने उच्चांकी १८१ कोटींचा ढोबळ नफा व शून्य टक्के नक्त एनपीए साध्य केले. एनपीए संकल्पना (NPA Concept) अस्तित्वात आल्यापासून शून्य टक्के नेट एनपीए व बँकेच्या स्थापनेपासून पहिल्यांदाच १८१ कोटींचा ढोबळ नफा या यशस्वी टप्प्यावर बैंक पोहोचली आहे. येथून पुढील काळातही बँक प्रगती पथावर राहील, अशी ग्वाही कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे (Kolhapur District Bank) अध्यक्ष आमदार हसन मुश्रीफ (Hussan Mushrif) यांनी शुक्रवारी (ता. १६) दिली. जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची ८४ वी वार्षिक सर्वसाधारण सभा मार्केट यार्डमधील शाहू सांस्कृतिक मंदिर येथे झाली. त्यावेळी ते बोलत होते.

kolhapur bank
Cotton Crop Damage : खानदेशात कपाशीच्या पक्व कैऱ्यांचे नुकसान

महाराष्ट्र सहकारी संस्था कायदा १९६० मध्ये झालेल्या सुधारणा अनुषंगाने बँकेच्या पोटनियमात सुधारणेबाबतच्या ठरावाचे वाचन सुरू होताच दुरुस्तीच्या मंजुरीवरून गोंधळ झाला. मंजूर-नामंजूरच्या घोषणेतच सभा आटोपती घ्यावी लागली. श्री. मुश्रीफ म्हणाले, की जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पाच लाख रुपयांपर्यंतचे पीककर्ज शून्य टक्के व्याजदराने म्हणजेच बिनव्याजी देण्याचा महत्त्वपूर्ण व ऐतिहासिक निर्णय केडीसीसी बँकेने आहे. पाच लाखांपर्यंतचे पीककर्ज बिनव्याजी देणारी केडीसीसी ही महाराष्ट्रासह बहुदा देशातील पहिली आणि एकमेव बँक ठरेल. शेतीच्या कर्जपुरवठ्यामध्ये बँक नेहमीच आघाडीवर राहिलेली आहे.

kolhapur bank
Edible Oil : उद्योजकतेचा ‘ड्रीम प्रोजेक्ट’ झाला यशस्वी

२०२१-२२ करिता शासनाने १७५० कोटी कर्जवाटपाचा इष्टांक दिला होता. त्याच्याही पुढे जात बँकेने २१४५ रुपये कोटी रुपये कर्ज वितरण करून १२३ टक्के इतकी इष्टांक पूर्तता केली आहे. जिल्ह्यातील ७६ टक्के शेतकऱ्यांना कर्जपुरवठा केला आहे.

मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. ए. बी. माने यांनी अहवाल वाचन केले.

माजी मंत्री सतेज पाटील, राजेंद्र पाटील यड्रावकर, खासदार संजय मंडलिक, आमदार विनय कोरे, श्रीमती निवेदिता माने, पी. एन. पाटील, राजू आवळे, भैया माने आदी उपस्थित होते. सभेच्या शेवटी सभासदांनी पोटनियमात सुधारणा करण्याबाबतच्या विषयावर गोंधळ घातला. इतर संस्थांऐवजी कारखाना प्रतिनिधिंनाच संचालकपदाची संधी द्यावी, अशी मागणी काहींनी करताच इतरांनी विरोध करत घोषणाबाजी केली.

गोंधळातच सभा संपवण्यात आली. पशुधन वाचवण्यासाठी बँकेचा प्रयत्न सध्या जिल्ह्यात जनावरांमध्ये लम्पीचा प्रादुर्भाव दिसून येत आहे. यासाठी वारणा दूध संघाकडून मोफत लसीकरण सुरू आहे. कोणत्याही परिस्थितीत पशुधन वाचले पाहिजे यासाठी जिल्हा बँक इथून पुढे अग्रक्रमाने प्रयत्न करणार आहे. यासाठी बँकेच्या नफ्यातील रक्कम वापरू, असे श्री. मुश्रीफ यांनी सांगितले. जिल्ह्यात एकरकमीच एफआरपी देणार कोल्हापूर जिल्ह्यात यंदा गाळप होणाऱ्या उसास एकरकमीच एफआरपी देण्यात येईल असे श्री. मुश्रीफ यांनी सर्व कारखानदारांच्या वतीने सांगितले. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जालिंदर पाटील यांनी हा प्रश्न उपस्थित केला होता.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com