Crop Damage  Agrowon
ताज्या बातम्या

Crop Damage : तीन लाख शेतकऱ्यांच्या नजरा अधिवेशनाकडे

जुलै व ऑगस्ट महिन्यांत झालेल्या अतिवृष्टी व पुरामुळे तब्बल पावणेचार लाख हेक्टरवरील शेतपिकांचे नुकसान झाले. शेतात पीक उभे असले तरी उत्पादन किती होईल, याबाबत अजूनही साशंकता आहे.

टीम ॲग्रोवन

यवतमाळ : जुलै व ऑगस्ट महिन्यांत झालेल्या अतिवृष्टी व पुरामुळे तब्बल पावणेचार लाख हेक्टरवरील शेतपिकांचे नुकसान (Crop Damage Due To Heavy Rain) झाले. शेतात पीक उभे असले तरी उत्पादन (Crop Production) किती होईल, याबाबत अजूनही साशंकता आहे. अशास्थितीत शेतकऱ्यांना मदतीची घोषणा शासनाने केली असली तरी प्रत्यक्षात अंमलबजावणीचे आदेश आलेले नाहीत. त्यामुळे नुकसानग्रस्त तीन लाख शेतकऱ्यांच्या नजरा अधिवेशनाकडे लागल्या आहेत.

जिल्ह्यात गेल्या जुलै महिन्यात सलग १५ दिवस संततधार पाऊस होता. काही तालुक्यांत अतिवृष्टी झाली. अतिवृष्टीने दीड लाख हेक्टरवरील शेतपिकांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज कृषी विभागाने वर्तविला आहे. प्रत्यक्षात पंचनामे पूर्ण झाल्यानंतर पुरामुळे पावणेतीन लाख हेक्टरपेक्षा जास्त क्षेत्रावरील पिकांचे नुकसान झाले आहे. ऑगस्ट महिन्यात झालेल्या पावसाने एक लाख हेक्टरवरील पीक बाधित झाले.

बहुतांश ठिकाणांच्या शेतकऱ्यांचे नुकसान ३३ टक्क्यांवर आहे. अजूनही अनेक शेतांत पाणी आहे. काही शेत पुरापासून बचावले असले तरी अतिपावसाने पिकांची वाढ खुंटली आहे. त्याचा परिणाम उत्पादनावर होण्याची दाट शक्यता आहे. जिल्ह्यातील १३१ मंडळांत अतिवृष्टीची नोंद झाली आहे. नदीनाल्यांना पूर गेल्याने नऊशेच्यावर गावे बाधित झाली आहेत. यामुळे शेतकरी संकटात सापडले आहेत.

शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी शासनाने मदतीची घोषणा केली. नुकसानीच्या क्षेत्रात एक हेक्टरची वाढ केली. प्रत्यक्षात अजूनही प्रशासनाला आदेश आलेले नाहीत. परिणामी, मदतीची घोषणा प्रत्यक्षात कधी उतरणार, याकडे शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे. सध्या राज्य विधीमंडळाचे पावसाळी अधिवेशन सुरू असल्याने त्यात निर्णय होऊन मदत मिळावी, अशी अपेक्षा शेतकऱ्यांना आहे.

कापूस, सोयाबीनचे सर्वाधिक नुकसान

पावसाने जुलै व ऑगस्ट महिन्यांत दमदार हजेरी लावली. नदीनाल्यांना पूर आला. प्रकल्पांतून पाण्याचा विसर्ग करण्यात आल्याने प्रकल्पाचे पाणी शेतशिवारात शिरल्याने शेती जलमय झाली. त्यात कापूस, सोयाबीन व तूर या पिकांचे अतोनात नुकसान झाले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Yavatmal Crop Insurance : यवतमाळच्या विम्यासंदर्भात सकारात्मक निर्णय घेऊ

Crop Insurance Scheme: नांदेडमध्ये पीकविमा योजनेत ९ लाखांहून अधिक अर्ज

Irrigation Projects : रखडलेल्या सिंचन प्रकल्पांना गती

Farm Loan Waiver: कर्जमाफी रक्कम वितरणास विलंब का? सहकारमंत्र्यांनी सांगितलं कारण

Mechanized Paddy Transplantation: यंत्राने भात लागवडीकडे वाढता कल

SCROLL FOR NEXT