वर्धा ः जिल्ह्यात जुलै महिन्यात झालेल्या पावसाने (Rainfall) १ लाख ८३ हजार ७५८.५४ हेक्टरवरील उभ्या पिकांचे नुकसान (Crop Damage) नोंदविण्यात आले आहे. १२२ कोटी ६९ लाख ५८ हजार ८७६ रुपयांच्या निधीची (Fund For Compensation) गरज यासाठी लागणार आहे. प्रशासनाने या निधीची मागणी शासनाकडे केली आहे.
मॉन्सूनच्या सुरुवातीला जून महिन्यात पावसाने खंड दिला. परिणामी शेतकऱ्यांची चिंता वाढली होती. त्यानंतर जुलै महिन्यात मात्र पावसाने पुरती दाणादाण उडाली. याचा फटका कपाशी, सोयाबीनसह सर्वच पिकांना बसला. १ लाख ८३ हजार ७८५ हेक्टरवरील पिके बाधित झाल्याचा अहवाल प्रशासनाने तयार केला आहे.
यामध्ये सर्वाधिक नुकसान समुद्रपूर तालुक्यातील शेतकऱ्यांचे नोंदविण्यात आले आहे. वर्धा तालुक्यात ३३ हजार ११, सेलू तालुक्यात २७ हजार ३८५, देवळी ३१ हजार २९९, आर्वी २४ हजार ६२४, आष्टी १७ हजार ९२३, कारंजा १८ हजार ४६९, हिंगणघाट २८ हजार ४४६ तर समुद्रपूर तालुक्यातील ३६ हजार १०२ शेतकऱ्यांच्या उभ्या पिकांचे नुकसान झाले आहे.
चार लाख हेक्टरवर विविध पिकांची लागवड
यंदाच्यावर्षी जिल्ह्यात ४ लाख २५ हजार हेक्टरवर विविध पिकांची लागवड करण्यात आली आहे. अतिवृष्टीमुळे १ लाख ८३ हजार ७८५.५४ हेक्टरवरील पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. यात वर्धा तालुक्यातील २९ हजार ६९४, सेलू तालुक्यात १५ हजार ७९९.९०, देवळी तालुक्यात ३७ हजार ८२६, आर्वी १९ हजार ३१३.६६, आष्टी १२ हजार ४००.५०, कारंजा १२ हजार ३७०.०३, हिंगणघाट ३० हजार ७८९.०५, तर समुद्रपूर तालुक्यात २५ हजार ६७९.८० हेक्टर क्षेत्राचा समावेश आहे.
तालुकानिहाय अपेक्षित निधी (रुपयात)
वर्धा ः २०,२७,२३,२००
सेलू ः १०,६९,५०,६४८
देवळी ः २३,२५,३४,४००
आर्वी ः १३,१५,९७,५०८
आष्टी ः ८,४६,८७,४००
कारंजा ः ८,४१,१६,२०४
हिंगणघाट ः २०,९७,८१,२७६
समुद्रपूर ः १७,४५,६८,२४०
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.