'गोकुळ'ने सुमारे ४० टक्के रक्कम डिबेंचर म्हणून कपात केल्याने दूध संस्था संतप्त 'गोकुळ' कार्यालयाच्या दारात उपोषण करण्याचा दूध उत्पादकांचा इशारा ...तर शनिवारपासून गोकुळ दूध संघाला दूध पुरवठा थांबवला जाईल.Gokul Dudh Sangh: कोल्हापूर जिल्हा दूध उत्पादक संघाचा (गोकुळ) 'डिबेंचर'चा मुद्दा सध्या चर्चेत आहे. 'गोकुळ'ने फरक बिलातून सुमारे ४० टक्के रक्कम डिबेंचर म्हणून कपात केल्याने दूध संस्था संतप्त झाल्या आहेत. डिबेंचर म्हणून मोठ्या प्रमाणात रक्कम कपात केल्याने दूध संस्थांना दिवाळीच्या आधी सभासदांना फरक वाटप करताना अडचणी येणार आहेत. याचा थेट फटका दूध उत्पादकांना बसणार आहे. हा मुद्दा आता दूध उत्पादकांनीही उचलून धरला आहे. .'गोकुळ'ने शुक्रवारपर्यंत डिबेंचरमधील २५ टक्के रक्कम दूध संस्थांच्या नावावर वर्ग करावी, अन्यथा कोल्हापूरमधील 'गोकुळ'च्या कार्यालयाच्या दारात उपोषण करण्याचा इशारा जिल्हा दूध उत्पादक संघटनेने दिला आहे. तसेच शनिवारपासून गोकुळ दूध संघाला दूध पुरवठा थांबवला जाईल, असेही संघटनेचे अध्यक्ष ज्योतिराम घोडके यांनी म्हटले आहे. .Gokul Dairy: दूध फरक वाटपातील गोंधळामुळे ‘गोकुळ’ प्रशासन धारेवर.गेल्या वर्षी १६ टक्के डिबेंचर म्हणून कपात केली होती. यंदा ४० टक्क्यांहून अधिक रक्कम डिबेंचर म्हणून कपात केली आहे. एकीकडे गायीच्या दुधाला प्रति लिटर २६ ते २७ रुपये दर दिला जात आहे. हा दर परवडणारा नाही. गायीच्या दुधाला ३५ रुपये दर देण्याची आमची मागणी आहे. अशा परिस्थितीत अधिक प्रमाणात डिबेंचर कपातीचा निर्णय हा दूध संस्थांसाठी अडचणीचा ठरणार असल्याचे त्यांनी म्हटले आहे..Gokul Dudh Sangh : 'गोकुळ'वर दूध संस्था संतप्त! एकीकडे १३६ कोटींचा दर फरक जाहीर, दुसरीकडे ४० टक्के डिबेंचर कपात? दूध उत्पादकांना फटका. 'गोकुळ'ची डिबेंचर योजना १९९३ पासून सुरु आहे. पण यंदा ४० टक्के डिबेंचर कपात केल्यांनतर वादाला तोंड फुटले आहे. १ मार्च २०२५ अखेर 'गोकुळ'कडे १४४ कोटी १६ लाख २६ हजार ५०० रुपयांची रक्कम डिबेंचर्स स्वरूपात आहे. ही योजना राबविताना सर्व कायदेशीर प्रक्रिया पूर्ण केल्याचा दावा 'गोकुळ'कडून करण्यात आला आहे..पण, या माध्यमातून प्रत्येक मोठ्या संस्थांची सात ते आठ लाख रुपये आणि छोट्या संस्थांची सुमारे १ लाख रुपये कपात करण्यात आली आहे. परिणामी, दूध संस्थांना दर फरक वाटप करताना आर्थिक अडचणींना तोंड द्यावे लागणार आहे. .ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.