Chh. Sambhajinagar News : शिवसेना-उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष संभाजीनगरच्यावतीने बुधवारी (ता. ८) जिल्हाधिकारी कार्यालयासमोर तीव्र निदर्शने करण्यात आली. शेतकऱ्यांना हेक्टरी ५० हजार रुपये नुकसान भरपाई, सरसकट संपूर्ण कर्जमुक्ती, पीक विम्याचे निकष पूर्ववत करावे आणि घरे व पशुधनासाठी निकष शिथिल करून मदत करावी, अशी मागणी यामधून करण्यात आली..यावेळी जिल्हाधिकारी यांना निवेदन सादर केले. त्यानुसार सप्टेंबर महिन्यात अतिवृष्टीचे महाप्रलयकारी संकट संभाजीनगर जिल्ह्यातील शेतकरी बांधवांच्या माथ्यावर कोसळले. शेतकऱ्यांच्या डोळ्यांदेखत शेती वाहून गेली, उभी पिके सडली आणि होत्याचे नव्हते झाले. .ही नैसर्गिक आपत्ती असली तरी, या संकटाच्या वेळी राज्य शासनाची उदासीनता आणि प्रशासनाचा दुर्लक्षपणा छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळणारा ठरलेला आहे.अतिवृष्टीने संपूर्ण संभाजीनगर छत्रपती जिल्ह्यातील शेती पूर्णतः उद्ध्वस्त झाली आहे. मात्र राज्य सरकार अजूनही कागदी घोडे नाचवत असून तुटपुंजी मदत जाहीर करून शेतकऱ्यांची फसवणूक केली आहे. .Crop Damage Compensation : अतिवृष्टिग्रस्त शेतकऱ्यांना भरीव मदत द्यावी.जिल्ह्यांमध्ये २ लाख ३६ हजार ५२८ हेक्टरहून अधिक क्षेत्रातील बागायती, जिरायती व फळ पिकाची शेती पूर्णतः नष्ट झाली आहे.५८७ गावे तर २ लाख ६२ हजार ८४० शेतकरी बांधव या आपत्तीने बाधित झाले आहेत. लहान मोठे पकडून २०० पेक्षा अधिक दुधाळ व ओढ काम करणारे जनावरे वाहून गेल्याने दगावली आहेत.अशा परिस्थितीत राज्य सरकारने संपूर्ण महाराष्ट्रासाठी ३१ हजार ६२८ कोटी रुपयांचे नुकसान भरपाई पॅकेज जाहीर केले आहे..Crop Damage Compensation : अतिवृष्टिबाधितांना चौपट दराने मदत द्या.एकट्या संभाजीनगर जिल्ह्यात लाखो कोटींचे नुकसान झालेले असताना जाहीर पॅकेज अत्यंत तुटपुंजे आहे. या पॅकेजच्या माध्यमातून शेतकऱ्यांना मुबलक मदत तर मिळणार नाही, तर शेतकऱ्यांच्या तोंडाला पाने पुसली गेल्याचा आरोप शिवसेना- उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून कऱण्यात आला. .या या निदर्शनात शिवसेना नेते चंद्रकांत खैरे, माजी विधान परिषद विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, सहसंपर्क प्रमुख विजयराव साळवे, राजू वैद्य, राजेंद्र राठोड, नानासाहेब पळसकर, सुनीता आऊलवार, आशा दातार, बाळासाहेब थोरात, ज्ञानेश्वर डांगे, शंकर ठोंबरे, आनंद भालेकर, विष्णू जाधव यांच्यासह शेकडो शिवसैनिक सहभागी झाले होते..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.