Onion Crop Damage Agrowon
ताज्या बातम्या

Onion Crop Damage : तीन एकरातील कांदा जमिनीतच सडला

अकोला तालुक्यातील माझोड परिसरात गेल्या दहा वर्षांत पहिल्यांदाच या मोसमात असे संकट ओढवले.

Team Agrowon

Akola Crop Damage News : जिल्ह्यात या महिन्यात सात ते नऊ एप्रिल दरम्यान वादळी पाऊस, गारपीट (फोगतेूदीस) झाली. अकोला तालुक्यातील माझोड परिसरात गेल्या दहा वर्षांत पहिल्यांदाच या मोसमात असे संकट ओढवले.

यामुळे काढणीला आलेल्या पिकांचे अतोनात नुकसान झाले. आता शेतकऱ्यांनी कांदा काढणी सुरु केल्यानंतर या आपत्तीचे दुष्परिणाम समोर येत आहेत. संतोष नागोराव पुंडे यांचा तीन एकरातील पूर्ण कांदा जमिनीतच सडला आहे. यामुळे मजुरांचा खर्चही घरातून देण्याची वेळ त्यांच्यावर आली आहे.

पुंडे म्हणाले, ‘‘मागील अनेक वर्षांपासून कांद्याचे उत्पादन घेतो. यंदा तीन एकरात लागवड केली होती. पीकही चांगले जमले होते. दरम्यान ७ ते ९ एप्रिल या काळात जिल्ह्यात झालेल्या अवकाळी पाऊस, गारपिटीच्या तडाख्यात माझोड शिवारही सापडले. यावेळी इतरांच्या पिकांसह आमचाही कांदा खराब झाला.

आता कांदा काढणीसाठी दोन दिवसांपासून महिला मजूर कामाला सांगितल्या होत्या. महिलांनी कांदा उपटून ठेवला. या कांद्याची पाहणी केली तर त्यातील १० टक्केही कांदा चांगला राहिलेला नाही. कांद्याच्या खालील बाजूचा भाग खराब झाला आहे. काही कांदे जमिनीतच सडले. खर्च सोडाच, मजुरांची मजुरीही कशी द्यावी, हा प्रश्‍न आहे.’’

कुटुंबाचे कष्ट अन् उत्पादन खर्चही वाया

तीन एकरांसाठी ५० हजारापर्यंत खर्च लागला आहे. कुटुंबाची मेहनत, बियाणे व काढणीची मजुरी हा खर्च आणखी वेगळा आहे. चांगले दिसणारे पीक डोळ्यासमोर असे झाल्याचे अक्षय तृतीयेच्या दिवशीच समोर आल्याने हा सणसुद्धा दुःखात गेला. पिकासाठी लोकांकडून आणलेले पैसे आता परत कसे द्यायचे हा पेच तयार झाला आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Loan Waiver : कर्जमुक्ती योजनेचा लाभ प्रत्येक पात्र शेतकऱ्याला द्या

Agri Development : शेती, उद्योग, जलसंधारण, पायाभूत सुविधांच्या गतीतून विकास

Pesticide Safety : कीटकनाशकांचा जबाबदारीने वापर करावा लागेल : भरणे

Farm Loan Waiver Benefits: मृत शेतकऱ्यांच्या वारसांना कर्जमाफीचा लाभ द्या : अमृतकर

Ahilyanagar Seed Stock : अहिल्यानगरमध्ये उपलब्ध बियाण्यांपैकी ४० टक्के शिल्लक

SCROLL FOR NEXT