Crop Damage Agrowon
ताज्या बातम्या

Crop Damage : अतिवृष्टीमुळे देऊळगावमाळी मंडलात हजारो हेक्टरमध्ये नुकसान

रविवारी ( ता.१८ ) सायंकाळी ढगांच्या गडगडाटासह जोरदार पाऊस संपूर्ण तालुक्यात बरसला. परतीच्या पावसाने खूप मोठे नुकसान झाले आहे.

टीम ॲग्रोवन

मेहकर, जि. बुलडाणा : तालुक्यातील देऊळगावमाळी मंडलात अतिवृष्टी (Heavy rain Buldana) झाल्याने व पेनटाकळी प्रकल्पाचे (Pentakali Project) सर्व दरवाजे उघडल्याने पैनगंगेला पूर (Painganfa River Flood) आला. शेतांमध्ये पाणी घुसल्याने हजारो हेक्टरवरील खरीप पिकांचे मोठे नुकसान (Crop Damage Buldana) झाले आहे.

रविवारी ( ता.१८ ) सायंकाळी ढगांच्या गडगडाटासह जोरदार पाऊस संपूर्ण तालुक्यात बरसला. परतीच्या पावसाने खूप मोठे नुकसान झाले आहे. कोराडी, पेनटाकळी प्रकल्पांच्या साठवण क्षेत्रात अति पाऊस पडल्याने (९९ मिलिमीटर) पेनटाकळीचे सर्व दरवाजे उघडण्यात येऊन सांडव्यातून सहा हजार ७४३ क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू झाला आहे.

कोराडी प्रकल्पाच्या सांडव्यातूनही मोठ्या प्रमाणात पाणी वाहत असल्याने पैनगंगा नदीला मोठा पूर येऊन दुधा, ब्रह्मपुरी, कल्याणा, उसरण, नागझरी, बाभूळखेड, मेहकर, परतापूर, अंत्री देशमुख, बोरी, सोनाटी आदी गावांच्या परिसरातील नदीकाठच्या शेतांमध्ये दूर अंतरापर्यंत पुराचे पाणी घुसून शेतात तलाव निर्माण झाल्याचे विदारक चित्र बघायला मिळाले.

कल्याणा येथील संतोष ठोकरे यांच्या १५ एकरांतील सोयाबीन प्लॉटसह येथील इतर शेतकऱ्यांच्या सोयाबीन पिकाचे मोठे नुकसान झाले आहे. सोयाबीनचे पीक मुळासकट उखडून वाहून गेले आहे. काही भागांत शेती खरडून गेली आहे. तूर, कपाशी, मका पिके जमिनीवर लोळली आहेत.

सोयाबीन सोंगणीचे काम काही ठिकाणी सुरू झाले होते. येत्या पंधरा दिवसांत सोयाबीन शेतकऱ्यांच्या घरात येणार होते. पण अवकाळी पाऊस व नदीपुरामुळे सहा हजार हेक्टरवरील पीक मातीमोल झाल्याचे भीषण चित्र आहे. बँकांचे कर्ज काढून, उसनवारी करून खरीप पिकांसाठी शेतकऱ्यांनी मोठा खर्च केलेला असल्याने व आता अतिपावसाने मोठी हानी झाल्याने शेतकरी चिंतातूर झाले आहेत.

देऊळगाव माळी मंडल क्षेत्रातील गावांच्या परिसरात अतिवृष्टीने व नदीच्या पुरामुळे झालेल्या शेतपिकांच्या व इतर नुकसानीचे पंचनामे करण्याबाबत मंडल अधिकारी, तलाठी यांना आदेश दिले असून, सर्वेक्षणाचा अहवाल आल्यावर तो वरिष्ठांकडे पाठविण्यात येईल.
डॉ. संजय गरकळ, तहसीलदार, मेहकर

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Ginger Research Center: आले संशोधन केंद्राचा पेच; कृषिमंत्र्यांच विधानपरिषदेत बैठकीचं आश्वासन 

Silk Market : बीड रेशीम कोष बाजारात शेतकऱ्यांचे शोषण

Turmeric Market : नांदेडला हळदीचे चुकारे थकल्याने लिलाव पाडले बंद

Agriculture Mechanization : टिलरने वाढले शेतकऱ्यांचे बळ

Agrowon Podcast: तुरीचा बाजार मंदीतच; हळदीला मर्यादीत उठाव, कांदा स्थिर, गवार तेजीत, तर कोबीची आवक कायम!

SCROLL FOR NEXT