Keshar Mango Agrowon
ताज्या बातम्या

Keshar Mango Production : यंदा केशर आंब्याचे उत्पादन कमीच

Mango Season Market : मराठवाड्यासह अनेक भागांतील केशर आंबा लवकर बाजारात आणण्यात शेतकऱ्यांनी काही अंशी यश मिळवले. परंतु उत्पादनात मात्र घटच दिसते आहे.

संतोष मुंढे ः ॲग्रोवन वृत्तसेवा

Chhatrapati Sambhaji Nagar News : मराठवाड्यासह अनेक भागांतील केशर आंबा (Kehar Mango) लवकर बाजारात आणण्यात शेतकऱ्यांनी काही अंशी यश मिळवले. परंतु उत्पादनात (Keshar Mango Production) मात्र घटच दिसते आहे.

अवकाळी पाऊस व गारपिटीने आलेल्या उत्पादनालाही फटका देण्याचे काम केल्याने उत्पादकांच्या नुकसानीत भर पडली. त्यामुळे यंदा हंगाम मध्यमच राहील, असा तज्ज्ञांचा अंदाज आहे. त्यामुळेच आता असलेले दरही स्थिर राहतील, असेही तज्ज्ञांचे म्हणणे आहे.

ग्राहकांचा लाडका केशर आंबा यंदा लवकर येण्याचे संकेत काही प्रमाणात खरे ठरले. तुळजापूर, पंढरपूर व सांगोला भागातील काही बागांमधील आंबा एप्रिलच्या पाहिल्या आठवड्यापर्यंतच काढायला आला.

माहितीनुसार कोकणाव्यतिरिक्त इतर महाराष्ट्रामध्ये ४५ हजार हेक्‍टरवर आंबा लागवड आहे. त्यापैकी साधारणतः २० ते २१ हजार हेक्टरवर अंबाबागा उत्पादनक्षम असाव्यात. त्यातील काही बागा २० ते २५ वर्षे जुन्या आहेत. तर नवीन ८ ते १० वर्षांतील बहुतेक बागा अतिघन पद्धतीने लागवड केल्या आहेत.

कोकण वगळता, मराठवाड्यासह राज्यातील केशर आंबा बागा साधारणत: डिसेंबर, जानेवारीमध्ये मोहरतात. यंदा आंबा बागांना मोहर लागणे नोव्हेंबर ते फेब्रुवारी दरम्यान सुरू राहिले.

सुरुवातीला मोहरलेल्या काही बागांतील आंबा मार्चअखेर किंवा एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात काढणीला आला. दुसऱ्या व तिसऱ्या टप्प्यातील मोहर व आंबा संकटात सापडल्याची स्थिती आहे. उत्पादन कमी असल्याने बाजारात आलेल्या केशर आंब्याला १५० ते २०० रुपये प्रति किलोपर्यंतचा दर मिळतो आहे.

गतवर्षीच्या हंगामात शंभर क्विंटल आंबा उत्पादन झाले होते. यंदा वादळ गारपिटीमुळे दीड दोन टन उत्पादन होईल की नाही याची खात्री नाही. विमा उतरवलाय पण अजून पंचनामा नाही आणि पाहणीही नाही.
- गजेंद्र खोत, टेंभुर्णी, ता. जाफराबाद, जि. जालना.
दरवर्षी ५० टन आंबा उत्पादन होते यंदा २५ ते ३० टन निघेल की नाही सांगता येणार नाही. वादळ वाऱ्याने आणि पावसाने नुकसान केले. फळमाशीचाही उपद्र सततच्या पावसामुळे दिसतो आहे.
- तानाजी वाडीकर, नागलगाव, ता. उदगीर, जि. लातूर.
गेल्या वर्षीच्या हंगामात सात ते आठ टन उत्पादन झाले होते. यंदा वादळ व पावसाने मोठे नुकसान केले. मोठ्या प्रमाणात गळ झाल्याने किमान दोन ते तीन टनच उत्पादन निघेल, अशी स्थिती आहे.
- मनोज कचकुरे, दरकवाडी, ता. जि. छत्रपती संभाजीनगर.
आंब्याचा हंगाम यंदा मध्यमच दिसतो आहे. पक्व होण्यापूर्वी आंब्याची तोड होणार नाही याची दक्षता अंबा उत्पादकांनी घ्यावी उत्पादन कमी असल्याने दर स्थिरच राहतील अशी आशा आहे. त्यामुळे ग्रेडिंग करून आंबा विक्रीला प्राधान्य द्यावे.
- डॉ. एम. बी. पाटील, प्रमुख, हिमायतबाग फळसंशोधन केंद्र, छत्रपती संभाजीनगर.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Maharashtra Rain Update: कोकण आणि घाटमाथ्यावर पावसाचा इशारा; मराठवाड्यात हलक्या सरी शक्य

Maize Excellence Center: ‘मका उत्कृष्टता केंद्र’ स्थापनेच्या प्रस्तावावर चर्चा

Jayakwadi Dam Water Released: जायकवाडी धरणातून खेर्डा प्रकल्पात पाणी पोहोचले!

Modern Agricultural Machinery: ट्रॅक्टरचलित रोटरी खुरपणी यंत्र

Rice Farming: भात शेतीसाठी ‘एडब्ल्यूडी’ तंत्रज्ञान

SCROLL FOR NEXT