Heavy Rainfall AGrowon
ताज्या बातम्या

Heavy Rainfall : सोलापूर जिल्ह्यात यंदा पावसाने सरासरी ओलांडली.

बार्शी, अक्कलकोट, उत्तर, दक्षिण सोलापुरात सर्वाधिक जोर

टीम ॲग्रोवन

सोलापूर ः जिल्ह्यात यंदाच्या हंगामात (Monsoon Season) जून आणि जुलैपर्यंत पावसाने हुलकावणी दिली. (Heavy Rainfall) पण नंतरच्या ऑगस्ट आणि सप्टेंबर या दोन्ही महिन्यांत मात्र आधीच्या दोन्ही महिन्यांतील हुलकावणीची भरपाई करत पावसाने जोरदार हजेरी लावली.

आजघडीला जिल्ह्याने पावसाची सरासरी ओलांडली आहे. आतापर्यंत जिल्ह्यात सर्वाधिक ५०६.४ मिलिमीटर पाऊस झाला. त्यात सहा तालुक्यांत सर्वाधिक पाऊस झाला आहे. सोलापूर जिल्ह्याची वार्षिक सरासरी ४४५ मिलिमीटर आहे. पण यंदा आतापर्यंत जवळपास ५०६.४ मिलिमीटर इतका पाऊस झाला आहे.

जून महिन्यात तुलनेने पावसाने पाठच फिरवली. पण जुलै महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात मात्र जिल्ह्यात पावसाने जिल्हा व्यापून टाकला. त्यानंतर ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात मात्र पावसाने जोरदार हजेरी लावली. उत्तर सोलापूर तालुक्यात ५५२ मिलिमीटर पाऊस अपेक्षित होता,

पण तब्बल ६६३ मिलिमीटर पाऊस झाला. अक्कलकोट तालुक्यात ५४३.४ मिलिमीटर ऐवजी तब्बल ६२९ मिलिमीटर पाऊस झाला. तर करमाळ्यातही या कालावधीत ४५७.७ मिलिमीटर पाऊस झाला, पण तब्बल ६२५ मिलिमीटर पाऊस झाला. तालुकास्तरावरील ही परिस्थिती असली,

तरी मंडलस्तरावरही तीन मंडलांत पावसाने सरासरीच्या पुढे पाऊल टाकले. त्यात मार्डी, बार्शी आणि पानगाव मंडलांत सर्वाधिक ८०० मिलिमीटर एवढा पाऊस झाला.

बार्शी मंडलात सर्वाधिक ८६१ मि.मी पाऊस

जिल्ह्यातील बार्शी, उत्तर सोलापूर, दक्षिण सोलापूर, अक्कलकोट, करमाळा या तालुक्यांत पावसाचा जोर सर्वाधिक राहिला. जिल्ह्यातील सर्वाधिक ८६१ मिलिमीटर पाऊस बार्शी मंडलात पडला आहे. बार्शीमध्ये जून ते २५ सप्टेंबर पर्यंत ६७९ मिलिमीटर एवढा पाऊस झाला.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Farm Loan Waiver: कर्जमाफी योजनेची प्रत्यक्ष अंमलबजावणी सुरु, शेतकऱ्यांची पहिली यादी जाहीर

Pandharpur Vitthal Darshan: दर्शन रांगेतील वयोवृद्ध दांपत्याला थेट विठ्ठल दर्शन

Kharif Crop Insurance: शेतकऱ्यांची खरीप पीकविम्याकडे पाठ

Fake Soybean Seed Issue: बोगस बियाण्यांच्या तक्रारीवर उलट शेतकऱ्यांवरच प्रश्नांचा भडिमार

Agriculture Scheme Subsidy Issue: परभणी जिल्ह्यातील ६७० शेतकरी अद्यापही अनुदानाच्या प्रतीक्षेत

SCROLL FOR NEXT