PM Kisan Scheme Agrowon
ताज्या बातम्या

PM Kisan : छत्तीस हजार शेतकरी ‘किसान’ योजनेपासून वंचित

डिसेंबर २०२२ ते मार्च २०२३ या कालावधीतील तेराव्या हप्त्याचा लाभ मिळण्यासाठी योजनेतील पात्र लाभार्थ्यांची बँक खाते आधारशी जोडणे बंधनकारक आहे.

Team Agrowon

PM Kisan Scheme जळगाव : प्रधानमंत्री किसान सम्मान निधी योजनेंतर्गत ३६ हजार ४९४ लाभार्थ्यांनी त्यांचे बँक खाते आधार क्रमांकास जोडलेले नाही. त्यामुळे या लाभार्थ्यांना या योजनेचा तेरावा हप्ता मिळणार नाही, अशी माहिती निवासी उपजिल्हाधिकारी राहुल पाटील यांनी दिली.

डिसेंबर २०२२ ते मार्च २०२३ या कालावधीतील तेराव्या हप्त्याचा लाभ मिळण्यासाठी योजनेतील पात्र लाभार्थ्यांची बँक खाते आधारशी जोडणे बंधनकारक आहे.

बँक खाते आधारशी संलग्न नसलेल्या प्रलंबित लाभार्थ्यांचे बँक खाते इंडिया पोस्ट पेमेंट बँकेमार्फत (आयपीपीबी) खाती उघडण्याची व ते खाते आधार क्रमांकाशी जोडण्याची कार्यवाही शासनाकडील सूचनांनुसार टपाल विभागाकडून सुरू आहे.

पीएम किसान लाभार्थ्याचे बँक खाते आधार क्रमांकास जोडणी न केलेल्या प्रलंबित लाभार्थ्यांच्या गावनिहाय याद्या त्या गावच्या पोस्टमन, पोस्टमास्तरांकडे देण्यात आल्या आहेत.

यादीतील लाभार्थ्यांना गावातील पोस्टमास्तर, पोस्टमन संपर्क करून इंडिया पोस्ट पेमेंट बँकेत त्यांचे खाते सुरू करून खाते आधार क्रमांकास जोडणी करून देतील. ही मोहीम ७ फेब्रुवारीपर्यंत राबविण्यात येणार आहे.

आधार संलग्न करण्यासाठी

प्रलंबित शेतकरी असे

तालुका शेतकरी

अमळनेर २,८८०

भडगाव १,९६८

भुसावळ १,२७७

बोदवड १,३९४

चाळीसगाव ३,५३५

चोपडा २,७२२

धरणगाव २,२३२

एरंडोल २,१५३

जळगाव २,२६२

जामनेर ३,२८७

मुक्ताईनगर २,१५४

पाचोरा २,५०३

पारोळा २,३९०

रावेर २,७१९

यावल ३,०१८

एकूण ३६ हजार ४९४

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Yavatmal Crop Insurance : यवतमाळच्या विम्यासंदर्भात सकारात्मक निर्णय घेऊ

Crop Insurance Scheme: नांदेडमध्ये पीकविमा योजनेत ९ लाखांहून अधिक अर्ज

Irrigation Projects : रखडलेल्या सिंचन प्रकल्पांना गती

Farm Loan Waiver: कर्जमाफी रक्कम वितरणास विलंब का? सहकारमंत्र्यांनी सांगितलं कारण

Mechanized Paddy Transplantation: यंत्राने भात लागवडीकडे वाढता कल

SCROLL FOR NEXT