PM Kisan : ‘पीएम किसान’चे प्रलंबित लाभार्थींनी बँक खाते उघडावे

प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेर्गंत पात्र शेतकरी कुटुंबास दोन हजार रुपये प्रती हप्ता या प्रमाणे सहा हजार रुपये प्रतिवर्षी लाभ देण्यात येतो.
PM Kisan Scheme
PM Kisan Scheme Agrowon

सोलापूर : प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेतर्गंत (PM Kisan Scheme) १३ व्या हप्त्याच्या लाभासाठी आधार संलग्न बँक खाते (Bank Account) अनिवार्य केलेले आहे.

इंडिया पोस्ट पेमेंट बँकेत (India Post Payment Bank) ०१ ते १२ फेब्रुवारी २०२३ या कालावधीत राज्यात यासाठी मोहीम राबविण्यात येत आहे. तसेच बँक खाते आधार क्रमांकाशी जोडण्याची सुविधा गावातील पोस्ट कर्मचारी यांच्यामार्फत उपलब्ध करण्यात आली आहे.

आयपीपीबी मार्फत आयोजित या मोहिमेमध्ये राज्यातील सर्व प्रलंबित लाभार्थीनी त्यांचे बँक खाते उघडावे, असे आवाहन कृषी आयुक्तालयाचे कृषी संचालक विकास पाटील (Vikas Patil) यांनी केले आहे.

प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेर्गंत पात्र शेतकरी कुटुंबास दोन हजार रुपये प्रती हप्ता या प्रमाणे सहा हजार रुपये प्रतिवर्षी लाभ देण्यात येतो.

योजनेच्या १३ व्या हप्त्याचा लाभ जमा करण्याची कार्यवाही सध्या सुरू आहे. केंद्र शासनाने १३ व्या हप्त्याचा लाभ मिळण्यासाठी लाभार्थीनी त्यांचे लाभ जमा करावयाचे बँक खाते आधार क्रमांकास जोडणे बंधनकारक केले आहे.

राज्यात सद्यःस्थितीत १४.३२ लाख लाभार्थींची बँक खाती त्यांच्या आधारक्रमांकास जोडलेली नाहीत. त्यामुळे या लाभार्थींच्या खात्यात १३ व्या हप्त्याचा लाभ जमा होणार नाही, असेही पाटील म्हणाले.

४८ तासात आधारलिंक सुविधा

योजनेतील प्रलंबित लाभार्थींची बँक खाती आयपीपीबी मध्ये उघडून ती आधार क्रमांकास जोडण्यासाठी आयपीपीबी कार्यालयास गावनिहाय याद्या उपलब्ध करून दिल्या आहेत.

लाभार्थींना त्यांचे बँक खाते आधार क्रमांकाशी जोडण्याची सुविधा त्यांच्या गावातील पोस्ट मास्टरमार्फत उपलब्ध करण्यात आली आहे.

PM Kisan Scheme
PM Kisan : ‘पीएम किसान’च्या प्रस्तावांचा गोंधळ कायम

यासाठी आपले आधार कार्ड, मोबाईल क्रमांक या कागदपत्रांच्या आधारे इंडिया पोस्ट पेमेंट बँकेत (आयपीपीबी) आपल्या गावातील पोस्ट विभागाचे कर्मचारी यांच्यामार्फत खाते उघडावे.

सदरचे बँक खाते आपल्या आधार क्रमांकाशी ४८ तासात जोडले जाईल, पात्र लाभार्थ्यांना या मोहिमेचा लाभ घ्यावा, असे आवाहनही कृषी संचालक पाटील यांनी केले आहे.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
document.addEventListener("qt-page-data", (e) => { console.log(e.detail); })
Agrowon
agrowon.esakal.com