Gram Panchayat Elections Agrowon
ताज्या बातम्या

Gram Panchayat Elections : जळगाव तालुक्यात होणार १२ लोकनियुक्त सरपंच

जिल्ह्यात सार्वत्रिक निवडणुका जाहीर झाल्या आहेत. जळगाव तालुक्यात १८ डिसेंबरला १२ ग्रामपंचायतींच्या निवडणुका होतील.

Team Agrowon

जळगाव : जिल्ह्यात सार्वत्रिक निवडणुका (Election Announced) जाहीर झाल्या आहेत. जळगाव तालुक्यात १८ डिसेंबरला १२ ग्रामपंचायतींच्या निवडणुका (Gram Panchayat Elections) होतील. त्यात १२ लोकनियुक्त सरपंचपदासाठी, तर ९२ जागा सदस्यपदासाठी, अशा एकूण १०४ जागांसाठी निवडणूक लढविली जाणार आहे. येत्या २८ नोव्हेंबरपासून निवडणूकप्रक्रिया सुरू होणार आहे. १८ डिसेंबरला मतदान होईल. १० डिसेंबरला मतमोजणी होऊन निकाल जाहीर होईल.

सरपंचपदाचे आरक्षण असे

भादली खुर्द : सर्वसाधरण स्त्री, भोलाणे : अनुसूचित जमाती, देऊळवाडे : अनुसूचित जमाती स्त्री, घार्डी आमोदा खुर्द : अनुसूचित जमाती स्त्री, जळके : नागरिकांचा मागास प्रवर्ग, किनोद : सर्वसाधारण, कुंवारखेडे : सर्वसाधारण, सावखेडा खुर्द : नामाप्र स्त्री, सजुदे : अनुसूचित जमाती स्त्री, वराड बुद्रुक व खुर्द : सर्वसाधारण स्त्री, वसंतवाडी : सर्वसाधारण, विदगाव : अनुसूचित जाती.

जळगाव तालुक्यातील १२ ग्रामपंचायतींच्या निवडणुकांसाठी २८ पासून जळगाव तहसील कार्यालयात उमेदवारी अर्ज दाखल करणे सुरू होईल. २ डिसेंबरपर्यंत अर्ज स्वीकारले जातील. ग्रामपंचायतीनिहाय अर्ज स्वीकारले जातील. ५ डिसेंबरला छाननी होईल. ७ डिसेंबरला माघारी होईल.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Disability Certificate Verification: दिव्यांग प्रमाणपत्राची टक्केवारी चाळीस टक्क्यांपेक्षा पेक्षा कमी

Summer Irrigation: उन्हाळी सिंचनातून हजारो हेक्टरला दिलासा

MLA Sanjay Puram: धान खरेदीचे उद्दिष्ट वाढविण्याची मागणी

Radhakrishna Vikhe Patil: नांदूर मध्यमेश्वरला शेती नापीक होण्याच्या प्रश्नावर करणार उपाय

Minor Irrigation Tax: पाटबंधारे विभागाने तातडीने ‘मायनर कर’ वसुली थांबवावी

SCROLL FOR NEXT