Medicinal Plants
Medicinal Plants Agrowon
ताज्या बातम्या

Farmer Subsidy : अनुदानासाठी खर्चाचे अंदाजपत्रकच नाही

Team Agrowon

Agriculture News अमरावती ः महात्मा गांधी रोजगार हमी योजनेत (Employment Guarantee Scheme) समावेशीत पानपिंपळी (Panpimpari) या पिकाकरिता खर्चविषयक तरतुदी निश्‍चित करण्यात आल्या नाहीत. परिणामी, हे पीक घेणाऱ्या शेतकऱ्यांवर अनुदानापासून (Subsidy) वंचित राहण्याची वेळ आली आहे.

पश्‍चिम विदर्भातील अमरावती, अकोला, तसेच बुलडाणा जिल्ह्यांत पानपिंपळी या वनौषधीचे उत्पादन होते. औषधी उत्पादक कंपन्यांकडून याला मागणी असून, दरही चांगला मिळतो. दोन वर्षांपूर्वी एकरी ३७ हजार रुपयांपेक्षा अधिकचे अनुदान या पिकांकरिता देण्यात येत होते.

याविषयी माहिती नसल्याने याचे लाभार्थी केवळ आठ ते दहा शेतकरीच होते. दरम्यान, शासनाने काही पिकांना ‘मनरेगा’तून वगळले त्यामध्ये पानपिंपळीचा देखील समावेश होता. त्यामुळे हवालदिल झालेल्या शेतकऱ्यांनी शासनस्तरावर या विषयी पाठपुरावा केला.

त्याची दखल घेत शासनाने पानपिंपळीचा समावेश पुन्हा ‘मनरेगा’अंतर्गत अनुदान योजनेत केला आहे. मात्र या पिकाच्या खर्चाचे अंदाजपत्रकच नव्याने तयार करण्यात आले नाही.

परिणामी, शेतकऱ्यांना अनुदान मिळण्यात अडचणीत येत आहेत. ही अडचण दूर करीत शेतकऱ्यांना अनुदान मिळावे, अशी मागणी आहे.

अमरावती, अकोला, बुलडाणा या तीन जिल्ह्यांत पानपिंपळी हे वनौषधी पीक शेतकरी घेतात. शासनाने याला मनरेगात समावेशीत केले आहे. परंतु पिकाच्या खर्चाचे अंदाजपत्रक तयार करण्यात आले नाही. परिणामी, अनुदान मिळण्यात अडचणी आहेत.

- विजय लाडोळे, अध्यक्ष, कार्ड (कम्युनिटी ॲक्‍शन फॉर रूरल डेव्हलपमेंट सोसायटी)

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Grape Farming : शेवडीची दुष्काळावर मात द्राक्षात तयार केली ओळख

Smart Meters : ‘स्मार्ट मीटर्स’चा बोजा ग्राहकांच्या खांद्यावरच

Kolhapur Rain : कोल्हापूर जिल्ह्याला वळवाचा तडाखा, पूर्व, दक्षिण भागात जोरदार पाऊस

Green Hydrogen : दिशा ‘हायड्रोजन हब’ची

Heavy Rain : पावसामुळे पाईट येथे घरे, पॉलिहाउसला फटका

SCROLL FOR NEXT