Agriculture Subsidy : तेलंगणाच्या धर्तीवर शेतकऱ्यांना मदत करा

राज्याचे अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शेतकऱ्यांना ६००० अनुदान देण्याची घोषणा केली. परंतु ही मदत अतिशय तुटपुंजी ठरणारी आहे.
Agriculture Subsidy
Agriculture SubsidyAgrowon

Agriculture Subsidy नांदेड : राज्याचे अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanavis) यांनी शेतकऱ्यांना ६००० अनुदान (Subsidy) देण्याची घोषणा केली. परंतु ही मदत अतिशय तुटपुंजी ठरणारी आहे. महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना तेलंगणा राज्याप्रमाणे दर वर्षी प्रतिएकर दहा हजार रुपये अनुदान (Agriculture Subsidy) देण्यात यावे, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी आमदार शंकरअण्णा धोंडगे (Shankar Anna Dhondge) यांनी पत्रकार परिषदेत केली.

गुरुवारी (ता.९) राज्याचे अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अर्थसंकल्पात शेतकऱ्यांना ६००० अनुदान देण्याची घोषणा केली. परंतु हे अनुदान तुटपुंजे आहे. सध्या महाराष्ट्रातील शेतकरी कापूस, सोयाबीन व कांद्यासह इतर पिकांचे भाव पडल्याने चिंतेत आहेत. सरकारच्या उदासीन धोरणामुळे शेतकरी हैराण आहेत.

Agriculture Subsidy
Indian Agriculture : थप्प्या मोजू नका रोकड मोजायला शिका

अशा स्थितीत राज्य सरकारला शेतकऱ्यांचे हित जपायचे असेल, तर सर्वप्रथम तेलंगणा राज्याचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांनी तेथील शेतकऱ्यांसाठी राबविलेल्या योजना आपल्या राज्यात राबविण्याची गरज आहे.

तेलंगणातील शेतकऱ्यांना प्रतिवर्षी प्रतिएकर दहा हजार रुपये मदत, तसेच शेतीसाठी मोफत वीज व पूर्णवेळ वीजपुरवठा केला जातो. तेलंगणात शेती सिंचनासाठी व्यवसायाला आधार दिला आहे.

Agriculture Subsidy
Agriculture Machinery Scheme : यांत्रिकीकरण योजनांतर्गत १२ कोटी ५३ लाखांवर निधी खर्च

तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांनी नांदेडमध्ये सभा घेऊन अब की बार किसान सरकार अशी घोषणा दिली आहे. या घोषणेमुळे राज्यातील शेतकऱ्यांचे लक्ष आपल्याकडे वेधून घेतले आहे. तेलंगणाच्या धर्तीवर महाराष्ट्रातही शेतकऱ्यांचा विकास शक्य असल्याची भावना येथील शेतकऱ्यांच्या मनावर बिंबवली.

त्यामुळे महाराष्ट्रातील शेतकरी केसीआर यांच्या पक्षाकडे आकर्षिले गेल्याचे लक्षात आल्यानंतर महाराष्ट्र सरकारने शेतकरी कुटुंबाला प्रति वर्षी सहा हजार अनुदानाची घोषणा केली. भविष्यात राज्यात असंतोष व बीआरएस पक्षाचा विस्तार होऊ नये यासाठी केलेला प्रयत्न आहे.

महाराष्ट्र सरकारने तेलंगणा राज्याच्या धर्तीवर महाराष्ट्रातही अशा योजना राबवून येथील शेतकऱ्यांना न्याय द्यावा. याबाबत सरकारकडे प्रत्यक्ष भेटून निवेदनाद्वारे मागणी करणार असल्याचे या वेळी धोंडगे म्हणाले. या वेळी राष्ट्रवादीचे माजी जिल्हाध्यक्ष दत्ता पवार, शिवराज धोंडगे, प्रवीण जेठेवाड, साहेबराव चव्हाण, शंकर पाटील उपस्थित होते.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
document.addEventListener("qt-page-data", (e) => { console.log(e.detail); })
Agrowon
agrowon.esakal.com