Tanha Pola  Agrowon
ताज्या बातम्या

Tanha Pola : तान्ह्या पोळ्याची परंपरा कायम

Bail Pola : या परंपरेला, लाकडी बैलाच्या (तान्हा) पोळ्याला यंदा २१७ वर्षे पूर्ण होत आहेत. राजे मुधोजी महाराज भोसले यांनी ही प्रथा आजही कायम ठेवली आहे.

Team Agrowon

Nagpur News : शहरात पोळा झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी तान्हा पोळा भरवण्याची परंपरा गेल्या अनेक वर्षांपासून सुरू आहे. या परंपरेला, लाकडी बैलाच्या (तान्हा) पोळ्याला यंदा २१७ वर्षे पूर्ण होत आहेत. राजे मुधोजी महाराज भोसले यांनी ही प्रथा आजही कायम ठेवली आहे. विशेष म्हणजे विदर्भ वगळता अन्यत्र कोठेही अशा प्रकारचा तान्हा पोळा साजरा केला जात नाही.

दुसरे श्रीमंत राजे रघुजी महाराज भोसले यांनी सन १८०६ मध्ये हा उत्सव सुरू केला. लहान मुलांना बैलांचे महत्त्व कळावे, असा उद्देश त्यामागे होता. रघुजी महाराज भोसले यांनी लाकडी बैल तयार करून मागविले व सर्व लहान मुलांना ते वाटण्यात आले.

जिवंत बैलांप्रमाणे त्यांना सजविण्यात आले. आंब्याचे तोरण लावून त्याला जिलेबी, फळे आता चॉकलेट, बिस्कीट अशा वस्तू लटकविण्यात येतात. त्यामध्ये मुलांना उभे करून त्यांच्याकडील लाकडी बैलाची पूजा केली जाते.

पूजा संपल्यानंतर तोरण तोडून पोळा फोडून वाजतगाजत हनुमान खिडकीचे दर्शन घेऊन हनुमानाला नारळ फोडत आल्यावर मुलांना खाऊ, पैसे वाटण्यात यायचे. या प्रथेला २१७ वर्षे पूर्ण होत आहेत.

राजे मुधोजी महाराज भोसले यांच्या वाड्यात आजही सर्वात मोठा लाकडी बैल आहे. त्याची उंची आठ फूट, तर लांबी सहा फूट असून बैलाच्या पायात चांदीचा तोडा घातला आहे. पूर्वी ज्याप्रमाणे राजे रघुजी भोसले वाजत गाजत मिरवणूक काढायचे त्याच परंपरेला अनुसरून यंदाही शुक्रवारी (ता.१५) मिरवणूक काढण्यात येणार आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

EL Nino Warning: ‘एल निनो’चा इशारा गांभीर्याने घ्यावा : डॉ. सहाय

Seed Distribution: तीन लाख क्विंटल बियाणे उपलब्ध: कृषिमंत्री दत्तात्रय भरणे

Banana Export Price: निर्यातीच्या केळीला २३०० रुपये दर

Farm Loan Waiver: एप्रिल २०१९ पासूनची सर्व पुनर्गठीत कर्जे माफीस अपात्र

Maharashtra Monsoon Update: मॉन्सून महाराष्ट्राच्या उंबरठ्यावर पोहोचला

SCROLL FOR NEXT