Heavy Rain Impact: रायगड जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून पावसाची संततधार सुरू असून, नदी-नाले दुथडी भरून वाहू लागले आहेत. समुद्रालाही उधाण आल्याने किनारपट्टीवर धोकादायक परिस्थिती निर्माण झाली आहे. या पार्श्वभूमीवर पर्यटकांसह नागरिकांनी आवश्यक सावधानता बाळगावी, असे आवाहन जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाने केले आहे..मॉन्सून पूर्णपणे सक्रिय झाल्याने जिल्ह्यात ताशी २२ ते २५ किलोमीटर वेगाने वारे वाहत आहेत. समुद्र पूर्णपणे खवळला असून, उंचच उंच लाटा किनाऱ्यावर धडकत आहेत..Road Safety Orders: पंढरपूर-सातारा महामार्गावरील अपघात प्रवण क्षेत्रांत तत्काळ उपाययोजना करा.हवामान विभागाने रायगड जिल्ह्यासाठी पुढील दोन दिवस धोक्याचा इशारा दिला असून, मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. त्यामुळे समुद्र अधिक खवळलेला असून, किनारपट्टीवर मोठ्या लाटा उसळत आहेत. या पार्श्वभूमीवर काशीद, वरसोली, अलिबाग, दिवेआगर आणि हरिहरेश्वर या समुद्रकिनाऱ्यांवर पर्यटकांना समुद्रात उतरण्यास मनाई करण्यात आली आहे. संबंधित यंत्रणांकडून समुद्रकिनाऱ्यांवर सतर्कतेच्या सूचना देण्यात येत असून, पर्यटकांना सुरक्षित अंतर राखण्याचे आवाहन केले आहे. दरवर्षीप्रमाणे १ जूनपासून जिल्ह्यातील सर्व वॉटरस्पोर्ट्स उपक्रम बंद करण्यात आले आहेत. तरीही काही हौशी पर्यटक समुद्रकिनाऱ्यांवर गर्दी करत असल्याचे चित्र आहे. खवळलेल्या समुद्रात अथवा भरतीच्या वेळी पाण्यात उतरणे जीवावर बेतू शकते. त्यामुळे कोणताही धोका पत्करू नये, असे प्रशासनाने स्पष्ट केले आहे..Tavshi Marapur Barrage Issues: तावशी-मारापूर मार्गावरील बंधारा ठरतोय धोकादायक.धोकादायक वावर टाळाजिल्ह्यातील सखल भाग, नदीकाठची गावे आणि धबधब्यांच्या परिसरातही नागरिकांनी अनावश्यक वावर टाळा, तसेच प्रशासनाच्या सूचनांचे पालन करावे, असे आवाहन केले आहे. आपत्कालीन काळात स्थानिक प्रशासनशी तातडीने संपर्क साधण्याचेही आवाहन केले आहे..नागरिकांनी धोकादायक पाण्यात उतरू नये, त्याचबरोबर हवामानाचा अंदाज घेऊनच बाहेर पडावे. खवळलेल्या समुद्रात दुर्घटनाग्रस्तांना वाचवणेही कठीण जात असल्याने समुद्रात उतरू नये.- सागर पाठक, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी, रायगड.ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.