Swapnil Shinde
वर्षभर शेतात राबणाऱ्या सर्जा-राजाला पोळा सणानिमित्त शेतकऱ्यांनी गुरुवारी कामाला जुंपले नाही.
बुधवारी दुपारी बैलांना आंघोळ घालून सायंकाळी पळसाच्या पानाने तुप, हळद लावून बैलांचे खांदे शेकले.
त्यानंतर गुरुवारी सकाळी घरच्या लक्ष्मीने बैलांची पूजा करून त्यांना पोळ्यानिमित्त पुरणपोळी जेवणाचे आवतन दिले.
त्याला झूल, मोरकीसह सर्वच वस्तू घालून सजवले. तसेच त्याची गावभर मिरवणूक काढण्यात आली.
गोडधोड आणि पूजा करून त्याच्याप्रती ऋण व्यक्त केले जातात.
दुष्काळी परिस्थिती आणि लम्पीच्या आजाराचे सावट पोळा सणावर दिसून आले.