Crop Damage Agrowon
ताज्या बातम्या

Crop Damage : सुधारित पैसेवारी पन्नास पैशांखाली

खरीप नुकसानीचा अंदाज; अंतिम पीकस्थिती नंतर समजणार

Team Agrowon


ॲग्रोवन वृत्तसेवा
नांदेड : जिल्ह्यातील खरीप हंगामाची (Kharif Season) नजरी पैसेवारी जाहीर झाल्यानंतर सोमवारी (ता. ३१ ऑक्टोबर) महसूल प्रशासनाने खरिपाची सुधारित पैसेवारी (Paisewari) जाहीर केली. यात जिल्ह्यातील सर्वच सोळा तालुक्यांची पैसेवारी पन्नास पैशांच्या आत जाहीर झाली आहे. यातून खरिपातील नुकसानीचा (Crop Damage) अंदाज येत आहे. अंतिम पैसेवारी जाहीर झाल्यानंतर जिल्ह्यातील पिकांची स्थिती लक्षात येईल.

जिल्हा प्रशासन दरवर्षी खरीप पिकांच्या परिस्थितीबाबत हंगामी, सुधारित व अंतिम पैसेवारी जाहीर करते. यातून पिकांच्या उत्पादकतेचा अंदाज येतो. जिल्ह्यात असलेल्या एक हजार ५६२ गावांत आठ लाख ५४ हजार ७६२ हेक्टर क्षेत्र लागवडीखाली येते. यापैकी यंदा आठ लाख १९९ हेक्टरवर खरिपात पेरणी झाली आहे. या पेरणीक्षेत्रात पेरलेल्या पिकांच्या परिस्थितीचा सुधारित अंदाज सोमवारी (ता. ३१) व्यक्त करण्यात आला आहे. यात सर्वच सोळा तालुक्यांची पैसेवारी पन्नास पैशाच्या खाली जाहीर झाल्याचा अहवाल जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी विभागीय आयुक्तांकडे पाठविला आहे. यानंतर १५ डिसेंबर रोजी अंतिम पैसेवारी जाहीर झाल्यानंतर जिल्ह्यातील पिकांची स्थिती लक्षात येणार आहे.

तालुकानिहास नजरी पैसेवारी
(कंसात गावांची संख्या)
नांदेड ४८ (८८), अर्धापूर ४८ (६४), कंधार ४७ (१२६), लोहा ४५ (१२७), भोकर ४९ (७७), मुदखेड ४९ (५५), हदगाव ४९ (१३७), हिमायतनगर ४७ (६४), किनवट ४७ (१९१), माहूर ४७ (९२), देगलूर ४८ (१०८), मुखेड ४९ (१३५), बिलोली ४७(९१), नायगाव ४८ (८९), धर्माबाद ४८ (५६), उमरी ४९ (६२). (नांदेड तालुक्यातील १३ गावांचे नागरीकरण झाले आहे.)

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Soybean Re-Sowing: दुबार पेरणीसाठी सरकार शेतकऱ्यांना मदत करणार, राज्य सरकारचा निर्णय, मंत्री बावनकुळेंची माहिती

Pandharpur Cycle Wari: पंढरपुरात रंगली ४ हजार सायकलस्वारांची आगळीवेगळी ‘सायकल वारी’

Kharif Sowing Delayed: पावसाच्या खंडामुळे खरिपाच्या पेरण्यांना ‘ब्रेक’

Farm Loan Waiver Scheme: लाखभर शेतकऱ्यांचा कोरा होणार ७/१२

Re Sowing Kharif: दुबार पेरणी करताना कोणती काळजी घ्यावी?

SCROLL FOR NEXT