Rain Update Agrowon
ताज्या बातम्या

Rain Update : वऱ्हाडात पावसाचा जोर ओसरला

बुलडाण्यात १९ हजार, अकोल्यात ८१२४ हेक्टरवर नुकसान

टीम ॲग्रोवन

अकोला ः या विभागात दसऱ्यापासून सुरू असलेल्या पावसाचा जोर काहीसा कमी झाला आहे. मात्र ९ ते १२ ऑक्टोबरदरम्यान संततधार पाऊस, अतिवृष्टी (Heavy Rainfall) व पुरामुळे मोठे नुकसान झाले आहे. बुलडाण्यात १९ हजारांवर, तर अकोला जिल्ह्यात ८,१२४ हेक्टरचे नुकसान झाल्याचा अहवाल बनवण्यात आला आहे. तर बुलडाणा जिल्ह्यात झालेल्या नुकसानीचे पंचनामे करण्याचे निर्देश पालकमंत्री गुलाबराव पाटील (Gulabrao Patil) यांनी यंत्रणांना दिले आहेत.

अकोला जिल्ह्यामध्ये ९ ते १२ ऑक्टोबर दरम्यान झालेल्या संततधार पाऊस, अतिवृष्टी व पुरामुळे सोयाबीन, कपाशी, तूर व भाजीपाला वर्गीय पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. अहवालानुसार तेल्हारा, मूर्तिजापूर व अकोट तालुक्यांतील आठ हजार १२४ हेक्टर क्षेत्र बाधित झाल्याची माहिती आहे.

यात तेल्हारा तालुक्यात एक हजार ४१३ हेक्टर, अकोट तालुक्यात एक हजार ३५६ हेक्टर, तर सर्वाधिक पाच हजार ३५५ हेक्टर नुकसान मूर्तिजापूर तालुक्यात झालेले आहे. जिल्ह्यात एक जूनपासून आजपर्यंत ७४७.५ मिलि पावसाची नोंद झाली असून, सरासरीच्या १०४ टक्के पाऊस झालेला आहे.

अतिवृष्टीच्या नुकसानीचे पंचनामे तातडीने पूर्ण करा ः पाटील

बुलडाणा जिल्ह्यात १० ते १२ ऑक्टोबरदरम्यान काही मंडलांत अतिवृष्टी झाली आहे. यामुळे शेतीपिकांचे मोठे नुकसान झाले आहे. अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे तातडीने पूर्ण करावेत. या पंचनाम्यातून एकही नुकसानग्रस्त शेतकरी सुटू नये, याची दक्षता घ्यावी, असे निर्देश पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी जिल्हाधिकारी यांना दिले आहे.

जिल्ह्यात १० ऑक्टोबरला सर्वदूर पाऊस झाला. मेहकर तालुक्यातील मेहकर मंडलात १०७ मिलि आणि नायगाव मंडलात १०७ मिलि, तर लोणार तालुक्यातील सुलतानपूर मंडलात १०५ मिलि पावसाची नोंद झाली आहे. या अतिवृष्टीमुळे दोन तालुक्यांतील सुमारे १९ हजार ६५ हेक्टर शेतीपिकाचे नुकसान झाले आहे.

याबाबतची माहिती मिळताच पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी जिल्हाधिकारी एस. रामामूर्ती यांच्याकडून सविस्तर माहिती घेतली. या तालुक्यातील नुकसानग्रस्त भागाचे पंचनामे तातडीने पूर्ण करण्याच्या सूचना दिल्या आहे. या पंचनाम्यातून नुकसानग्रस्त एकही शेतकरी वंचित राहणार नाही, याची दक्षता घ्यावी, असे निर्देश त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहेत. सद्यःस्थितीत मेहकर आणि लोणार तालुक्यातील शेती पिकाच्या नुकसानीचे पंचनामे सुरू करण्यात आले आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Bhaskar Jadhav In Assembly: शेतकरी आत्महत्या, कृषी योजना आणि खोट्या आश्वासनांवरून जाधवांनी सरकारला धरले धारेवर

Group Farming : गटशेती हा शाश्‍वत शेतीचा प्रभावी पर्याय ठरू शकतो

Parbhani Rainfall : जून महिन्यात सरासरीहून कमी पाऊस

Farmer Aid Cancellation: नैसर्गिक आपत्तीच्या मदतीत कपात, शेतकऱ्यांची फसवणूक; वड्डेटीवारांचा सरकारवर निशाणा

Raj-Udhhav Unity : ठाकरे बंधूंची एकजूट पालिकेतही दिसावी

SCROLL FOR NEXT