Onion Producer  Agrowon
ताज्या बातम्या

Onion Producer Issue : कांदा उत्पादकांचे दुःख जाणून तत्परतेने मदत करा

Rayat Kranti : रयत क्रांती संघटनेची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

Team Agrowon

ॲग्रोवन वृत्तसेवा
Nashik Onion Market : जिल्ह्यातील अस्मानी संकटामुळे सर्व शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले आहे. उन्हाळ कांदा पावसाच्या व गारपिटीच्या तडाख्यात ३० ते ४० टक्के खराब झाला आहे.

उर्वरित ५० टक्के कांदा ब प्रतवारीचा असून तो उत्पादन खर्चाच्या खाली विक्री होत आहे.

त्यामुळे कांदा उत्पादकांचे दुःख शासनाने जाणून तत्परतेने मदत करावी, अशी मागणी रयत क्रांती संघटनेच्या वतीने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे करण्यात आली.

माजी कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी मंगळवार (ता.३०) रोजी कांदा प्रश्नासंदर्भात शिष्टमंडळासह मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांची भेट घेतली.

या वेळी माजी शिष्टमंडळात रयत क्रांती संघटनेचे प्रदेशाध्यक्ष दीपक पगार, कोअर कमिटीचे सदस्य शिवनाथ जाधव, नाशिक जिल्हाध्यक्ष विशाल पवार, युवराज देवरे, नितीन कोर, मधुकर कापडणीस आदी उपस्थित होते.

शेतकऱ्याला १ किलो कांदा पिकविण्यासाठी १० ते १२ रुपये उत्पादन खर्च येतो. बाजारात कांदा १ ते ४ रुपयांनी सरासरी विकला जात आहे.

अवकाळीने डाळिंब व द्राक्ष बागेचे नुकसान झालेआहे. डाळिंबाची फूलगळ होऊन खोडास इजा पोहोचली आहे. कांदाचाळ शेड व राहत्या घराचे हवेत पत्रे उडून मोठे नुकसान झाले आहे.

त्यामुळे शासनाने मदत करावी. अन्यथा अधिकाऱ्यांना घेराव घालावा लागेल. मोठे जन आंदोलन उभे करावे लागेल, असा इशारा सरकारला देण्यात आला आहे.

संघटनेच्या मागण्या अशा...
- लाल कांद्याप्रमाणेच उन्हाळ कांद्यास प्रतिक्विंटल रुपये ५०० प्रमाणे अनुदान जाहीर करा
-मध्यप्रदेश शासनाच्या कांदा भावांतर योजनेच्या धर्तीवर महाराष्ट्र शासनाने बाजार समितीतील भावांतर योजनेत कांदा खरेदी करावा.


- नाफेडची कांदा खरेदी त्वरित चालू करावी
- नाफेडचे चाळीचे जिओ टॅग करून फोटो काढावेत. मगच कांदा चाळीत कांदा भरण्याची अनुमती नाफेडने द्यावी.


- चालूवर्षी पिकासाठी आलेले वीजबिल स्वतः शासनानेच भरून द्यावे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Shiv Sena Split Case: शिंदेंनी कोणत्या आधारे 'मुख्य नेता' पद स्वतःला बहाल केलं? ठाकरेंच्या वकिलांचा जोरदार युक्तिवाद

Rain Damage Compensation: अतिवृष्टीग्रस्तांसाठी ३९ कोटींच्या निधी वाटपाला गती

Krantisinha Nana Patil Award : क्रांतिसिंह नाना पाटील पुरस्कार’ राजू देसले यांना

Farmers Loan Waiver: शेतकऱ्यांची कर्जमुक्तीकडे वाटचाल

Koyna Dam Water : कोयना धरणातून पाण्याचा विसर्ग पूर्णपणे बंद

SCROLL FOR NEXT